शहरं
Join us  
Trending Stories
1
शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २३ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
2
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
3
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
4
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
5
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
6
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
7
धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
8
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
9
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
10
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
11
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
12
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
13
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
14
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
15
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
16
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
17
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
18
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
19
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
20
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेते सुनील केदार यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा, दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 17:05 IST

नागपूर सत्र न्यायालयाचा निकाल

नागपूरसरकारी अधिकाऱ्याला मारहाण व शिवीगाळ करण्याच्या प्रकरणामध्ये शुक्रवारी माजी मंत्री सुनील छत्रपाल केदार यांच्यासह एकूण चार आरोपींना एक वर्ष सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, प्रत्येकी एकूण १४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश मंगला मोटे यांनी हा निर्णय दिला.

अन्य तीन आरोपींमध्ये मनोहर शंकर कुंभारे, वैभव अरुण घोंगे (दोघेही रा. बोरगाव) व दादाराव लेकराम देशमुख (रा. तेलकामठी) यांचा समावेश आहे. ही घटना २०१६ मधील आहे. त्यावेळी कोराडी-२ ते कोराडी-३ उपकेंद्रांपर्यंत ४०० केव्हीची वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. मुंबईतील बजाज इलेक्ट्रिकल कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले होते. कामावर देखरेख ठेवण्यासाठी महापारेषण कंपनीचे सहायक अभियंता अमोल खुबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. ६ ऑक्टोबर २०१६ रोजी दुपारी २.३० च्या सुमारास खुबाळकर व बजाज कंपनीचे सचिन घाटबांधे, शेतकरी हबीब तेलकाळे यांच्या शेतात सुरू असलेले काम पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान, सुनील केदार व इतर आरोपी तेथे गेले व या कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप केला. तसेच, केदार यांनी शिवीगाळ करीत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केल्याबद्दल जाब विचारला व खुबाळकर यांच्या गालावर दोन थपडा मारल्या.

कुंभारेनेही त्यांना एक थप्पड मारली. त्यानंतर इतर आरोपींनी घाटबांधे यांना मारहाण केली आणि साहित्य व मशिन परत घेऊन जाण्याची धमकी दिली. खुबाळकर यांच्या तक्रारीवरून केळवद पोलिसांनी आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. याचा तपास तत्कालिन ठाणेदार याेगेश पारधी यांनी केला. न्यायालयात सरकारी वकील ॲड. अजय माहुरकर यांनी विविध ठोस पुराव्यांच्या आधारावर आरोपींविरुद्धचे गुन्हे सिद्ध केले. आरोपींतर्फे ॲड. चंद्रशेखर जलतारे यांनी बाजू मांडली.

आरोपींना अशी झाली शिक्षा

  • भादंवि कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा निर्माण करणे) व कलम ३३२ (सरकारी नोकराला दुखापत करणे) अंतर्गत प्रत्येकी एक वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास.
  • भादंवि कलम ५०४ (अपमान करणे) व कलम ५०६ (धमकी देणे) अंतर्गत प्रत्येकी सहा महिने कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास.
टॅग्स :Sunil Kedarसुनील केदारCourtन्यायालयnagpurनागपूर