शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

"काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांना खाेटे बाेलण्याची सवय लागली" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

By आनंद डेकाटे | Updated: June 7, 2025 18:01 IST

Nagpur : ठाकरे भावांपेक्षा माध्यमांमध्येच उत्कटता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांच्या टक्केवारी बाबत घेण्यात आलेल्या आक्षेपावर निवडणूक आयोगाने आकडेवारी सह प्रमाण दिले आहे. परंतु काँग्रेस नेते राहुल गांधींना खोटे बोलण्याची सवय लागली आहे. ते खोटे बोलून स्वतःच्या मनाला समजावत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दैनिक लोकमतमध्ये शनिवारी छापून आलेल्या राहुल गांधी यांच्या लेखावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मत घोटाळ्यावर भाष्य केले होते. राहुल गांधी यांच्या लेखाबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांनी बिहारमध्ये हार मानलेली आहे. पण राहुल गांधी जमिनीवर उतरणार नाही. स्वतःशीच खोट बोलणे सोडणार नाही, खोटे आश्वासनाने दिलासा देण्याचे सोडणार नाही, तोपर्यंत त्यांचा पक्ष कधीही निवडणुकीत जिंकणार नाही, त्यांना जागे व्हावे लागेल, वस्तुस्थिती समजून घ्यावी लागेल. अशा पद्धतीने खोटं ते नेहमी बोलत असतात मतदारांचा अपमान करत असतात. राहुल गांधीने महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान केला आहे. राहुल गांधी जे बोलतात ते त्यांनाही माहित नसते ऐकणाऱ्या समजत नाही.

रोज खोटे बोलले की लोकांना खरे वाटते असे राहुल गांधींना वाटत आहे. त्यामुळे त्याच त्या गोष्टी सातत्याने बोलत असतात. यापूर्वी देखील त्यांनी असा आरोप केलेला आहे. आमच्या लाडक्या बहिणीचा अपमान राहुल गांधी करत आहे, असेही फडणवीस म्हणाले

ठाकरे भावांपेक्षा माध्यमांमध्येच उत्कटतामुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येण्याच्या चर्चाना ऊधान आले आहे. त्याबाबत फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले. जेवढी उत्कटता या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबद्दल माध्यमांमध्ये दिसत आहे. तेवढी दोन्ही भावांमध्ये दिसत नाही आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूरRahul Gandhiराहुल गांधी