लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ.भा. काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त सरचिटणीस व राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांचे आज मंगळवारी नागपुरात आगमन होत आहे. या निमित्ताने सकाळी १०.३० वाजता शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीतर्फे देवडिया काँग्रेस भवन येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सत्कार समारंभाला शहर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहतील. शहर काँग्रेसला बळकट करण्यासाठी अविनाश पांडे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. शहर काँग्रेसचे पदाधिकारी, माजी खासदार, माजी मंत्री, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, पराभूत उमेदवार, काँग्रेस सेवादल, महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या, आदींनी सत्कार कार्यक्रमाला तसेच रेल्वे स्टेशनवर उपस्थित राहावे, असे आवाहन नगर काँग्रेसचे महामंत्री डॉ. गजराज हटेवार यांनी केले आहे.
काँगे्रसचे सरचिटणीस अविनाश पांडे यांचा आज सत्कार
By admin | Updated: May 9, 2017 01:56 IST