शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये काँग्रेस हरली तरी भविष्यात त्याचा फायदा होईल; पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 20:43 IST

गुजरात निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला. मात्र यानिमित्त तयार झालेल्या राजकीय वातावरणामुळे पक्षातील गळती थांबली. त्यामुळे येणाऱ्या काळात पक्षाला मोठा फायदा होईल, असे मत माजी मुख्यमंत्री कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकाँग्रेसला ग्रामीण भागात चांगले समर्थन मिळाले

आॅनलाईन लोकमतनागपूर : गुजरात निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला. मात्र यानिमित्त तयार झालेल्या राजकीय वातावरणामुळे पक्षातील गळती थांबली. त्यामुळे येणाऱ्या काळात पक्षाला मोठा फायदा होईल, असे मत माजी मुख्यमंत्री कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी भाजप सूट, बूटचा पक्ष असल्याची टीका केली होती. गुजरात निवडणुकीच्या परिणामाच्या दिवशी सुरुवातीला कॉंग्रेस समोर असल्याचे चित्र होते. त्यावेळी शेअर मार्केट पडले, नंतर भाजप समोर असल्याचे चित्र येताच त्यात तेजी आली. यामुळे व्यापारी, उद्योगपतींचा भाजपशी थेट संबंध असल्याचे स्पष्ट होते. निवडणुकीत काँग्रेसला ग्रामीण भागात चांगले समर्थन मिळाले. ग्रामीण भागातील नागरिकांनी सरकारच्या कृषी धोरणाला नाकारल्याचे स्पष्ट होते. भापजकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाल्याचा आरोपही त्यांनी लावला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली. त्यांना अध्यक्ष केल्याने पुढील निवडणुकीत फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दबावामुळेच माजी मुख्यमंत्र्यांनी सोडली कॉंग्रेस?निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील नेते माजी मुख्यमंत्री यांनी काँग्रेस सोडली. राज्यातही हाच प्रकार घडला. विशेष म्हणजे, त्यांना कोणताही फायदा झाला नाही. यामागे काही तरी कारण आहे. कोणत्या तरी दबावाखाली त्यांनी पक्ष सोडला असून, यामागे भाजप असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली.

 

 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७