शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

शिक्षक मतदार संघात काँग्रेस कोमात

By admin | Updated: January 12, 2017 01:39 IST

नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असताना काँग्रेसमध्ये सारेकाही सामसूम आहे.

उमेदवारीबाबत अद्याप निर्णय नाही : राष्ट्रवादीला समर्थन देण्याचा विचार नागपूर : नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असताना काँग्रेसमध्ये सारेकाही सामसूम आहे. पक्षाचा उमेदवार लढणार की कुणाला समर्थन देणार हे सर्व गुलदस्त्यात आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात आहेत. काँग्रेस नेत्यांनी याबाबत कुठलीही भूमिका जाहीर न केल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी नाईलाजास्तव समविचारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा विचार मांडला आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी होऊ शकली नाही. याचा फटका राष्ट्रवादीला बसला. त्यामुळे आता शिक्षक मतदारसंघही काँग्रेस रिंगणात उतरेल, असे अपेक्षित होते. मात्र, तसे होताना दिसत नाही. नागपूर शिक्षण मतदार संघावर विश्वनाथ डायगव्हाणे यांच्या रूपात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सलग तीन टर्म वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसचे बळ मिळत असल्याने विमाशीचे उमेदवार निवडून यायचे असे बोलले जाते. २०१० च्या निवडणुकीत काँग्रेसचे समर्थन देऊनही डायगव्हाणे यांना मात खावी लागली. भाजपचे नागो गाणार विजयी झाले. डायगव्हाणे यांच्या पराभवानंतर काँग्रेस विचारसरणीचे शिक्षक सक्रिय झाले. काँग्रेसचा स्वतंत्र शिक्षक सेल स्थापन करण्यात आला. या सेलच्या माध्यमातून बरेच काम करण्यात आले. त्यामुळे आता काँग्रेस शिक्षक सेलचा उमेदवार रिंगणात उतरेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. उमेदवारीसाठी पुरुषोत्तम पंचभाई, अनिल शेंडे, जयंत जांभूळकर यांच्या नावाचीसुद्धा चर्चा होती. मात्र, पक्षाकडून उमेदवार लढविण्यासाठी हालचालीच झाल्या नाहीत. यामुळे काँग्रेस शिक्षक सेलमध्ये नाराजी पसरली आहे. ३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून १७ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. काँग्रेसकडे आता वेळ कमी आहे. निवडणुकीत उमेदवार लढवायचे की कुणाला समर्थन द्यायचे, याबाबत मार्गदर्शन मागविणारा प्रस्ताव काँग्रेस शिक्षक सेलच्या जिल्हा संघटनेने प्रांतीय अध्यक्ष मनोज पाटील यांच्याकडे पाठविला होता. मात्र, त्यांच्याकडूनही कुठलाच निर्णय आला नाही. (प्रतिनिधी) राष्ट्रवादीला समर्थन देण्याचा ठराव ज्येष्ठ नेत्यांनी कुठलेही दिशानिर्देश न दिल्यामुळे शेवटी मंगळवारी काँग्रेस शिक्षक सेलच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक उपाध्यक्ष सिद्धार्थ ओंकार यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. या बैठकीत सचिव बाळा आगलावे यांनी कुणाला समर्थन द्यायचे, या संबंधीचा प्रस्ताव चर्चेला ठेवला. चर्चेअंती जिल्हा संघटनेने समविचारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे उमेदवार खेमराज कोंडे यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला, असे आगलावे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. काँग्रेस शिक्षक सेलच्या या निर्णयामुळे विमाशीचे उमेदवार आनंद कारेमोरे यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.