शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘ईव्हीएम’मुक्तीसाठी काँग्रेस राज ठाकरेंसोबत : विजय वडेट्टीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 21:33 IST

क्रांतिदिवसाला इंग्रजांविरोधात ‘चले जाव’चा नारा देण्यात आला होता. आज देशात तशीच स्थिती असून निवडणुकांची जबाबदारी असलेले निवडणूक आयोग कुणाच्या तरी हातातील कठपुतली असल्याप्रमाणे भूमिका घेत आहे. ९ ऑगस्ट रोजी मुंबईतून देशाला ‘ईव्हीएम’मुक्त करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. यासाठी पुढाकार घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस पक्ष उभा आहे, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

ठळक मुद्दे सरकारकडून सापळा रचून विरोधी गटांतील नेत्यांची शिकार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : क्रांतिदिवसाला इंग्रजांविरोधात ‘चले जाव’चा नारा देण्यात आला होता. आज देशात तशीच स्थिती असून निवडणुकांची जबाबदारी असलेले निवडणूक आयोग कुणाच्या तरी हातातील कठपुतली असल्याप्रमाणे भूमिका घेत आहे. ९ ऑगस्ट रोजी मुंबईतून देशाला ‘ईव्हीएम’मुक्त करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. यासाठी पुढाकार घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस पक्ष उभा आहे, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. ‘ईव्हीएम’संदर्भात निवडणूक आयोगात दुमत आहे. देशात अशी स्थिती कधीही उद्भवली नव्हती. निवडणूक आयोगाने आम्हाला बोलवावे, आम्ही ‘ईव्हीएम’चा फोलपणा सिद्ध करून दाखवू. राज ठाकरे यांनी सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात ‘ईडी’ची चौकशी लावून त्यांचा आवाज दाबण्याचा सरकारने प्रयत्न करू नये, असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. राज्य शासनाच्या भूमिकेमुळे राज्यातील सहकार क्षेत्राचे वाटोळे झाले. सर्वच क्षेत्रात बेरोजगारी वाढली. अशा स्थितीत आपले अपयश लपविण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्यात येत आहे. याऐवजी सरकारने कामे केली असती तर अशी वेळच आली नसती, असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादीच्या नेत्यांना ‘अलीबाबा और चालीस चोर’ असे भाजपची नेतेमंडळी म्हणायची. आज त्यांच्या नेत्यांना सापळा रचून त्यांची शिकार करणे सुरू आहे. आता भाजपात आल्यानंतर त्यांच्यादृष्टीने ‘चोर’ असलेले लोक पवित्र झाले का, असा प्रश्नदेखील वडेट्टीवार यांनी केला.मिलिंद नार्वेकरांनी दिली सेनेत येण्याची ‘ऑफर’शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मला २५ वेळा फोन केले. यातील २३ वेळा मी फोन उचलला नाही. त्यांनी मला शिवसेनेत येण्याची ‘ऑफर’ दिली. तुमच्या येण्यामुळे आम्ही परत सत्तेत येऊ. तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येईल, असे प्रलोभनदेखील दिले. मात्र माझी भूमिका स्पष्ट आहे व मी कधीही काँग्रेसशी गद्दारी करणार नाही, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. ‘वर्षा’तून एकही फोन आला नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMediaमाध्यमेEVM Machineएव्हीएम मशीन