शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

घोटाळ्यांवर काँग्रेस आक्रमक

By admin | Updated: August 13, 2016 02:05 IST

शहरातील उखडलेले रस्ते, स्टार बस, जेट पॅचर, केबल डक्ट, दहन घाटावरील लाकूड पुरवठयात झालेला घोटाळा, ओसीडब्ल्यू ...

नागपूर : शहरातील उखडलेले रस्ते, स्टार बस, जेट पॅचर, केबल डक्ट, दहन घाटावरील लाकूड पुरवठयात झालेला घोटाळा, ओसीडब्ल्यू व डांबर घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत काँग्रेस सदस्यांनी शुक्रवारी महापालिका सभागृह डोक्यावर घेतले. घोटाळ्यांचे फलक उंचावून जोरदार नारेबाजी करीत गोंधळ घातला. विरोधकांचे आक्रमक भूमिका पाहून महापौर प्रवीण दटके यांनी गोंधळातच अजेंड्यावरील विषय पुकारले व काही मिनिटात महापालिकेची सर्वसाधरण सभा गुंडाळली. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस सदस्यांनी डांबर खाणाऱ्यांवर कारवाई करा, रस्त्यांवरील खड्ड्यांचे काय, स्टार बस व्यवस्थानावर पोलिसात गुन्हा दाखल करणार का, जेटपॅचर कंपनीवर कारवाई करा, ओसीडब्ल्यू विरोधात कारवाई करा, अशा आशयाचे फलक झळकावत काँग्रेस सदस्यांनी घोषणाबाजी केली. नगरसेवक प्रशांत धवड, दीपक कापसे, संजय महाकाळकर, योगेश तिवारी, देवा उसरे, अरुण डवरे, सुरेश जग्याशी, महेंद्र बोरकर, सरस्वती सलामे, पुरुषोत्तम हजारे, राजू थूल, कुमुदिनी कैकाडे, मालू वनवे,पद्मा उईके, राजश्री पन्नासे, रेखा बाराहाते आदींनी महापौरांच्या आसनापुढे धाव घेत दोषीवर कारवाईची मागणी जोरकसपणे लावून धरली. विरोधक नमते घेण्याच्या मूडमध्ये नव्हते. गोंधळामुळे महापौरांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब केले. परंतु सभागृहाच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतरही सदस्यांनी नारेबाजी करीत गोंधळ घातला. शेवटी गोंधळातच दटके यांनी अजेंड्यावरील विषय पुकारून कामकाज गुंडाळले. उखडलेल्या रस्त्यांना जबाबदार असलेले कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याबाबतचा अहवाल सभागृहात सादर करण्याचे आश्वासन आयुक्तांनी मागील सभेत दिले होेते. परंतु अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. कंत्राटदार व अधिकाऱ्यांचा वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विकास ठाकरे यांनी केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वपक्षीय समिती गठित करण्यात आलेली आहे. समितीच्या अहवालानुसार आयुक्त कारवाई करणार आहेत. याबाबतचा अहवाल पुढील सभागृहात ठेवला जाईल, अशी ग्वाही प्रवीण दटके यांनी दिली. परंतु यावर विरोधी सदस्यांचे समाधान झाले नाही. प्रशासन दोषी कंपन्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. रस्त्यांचे डांबर खाणाऱ्यांवर कारवाई करून कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी जेट पॅचर कंपनीवर आहे. परंतु महापालिकेचा हॉटमिक्स प्लँट असताना ही कंपनी वर्षभर रस्त्यांची कामे करीत आहे. दहन घाटावरील लाकूड घोटाळा प्रकरणात महेश ट्रेडिंग कंपनीवर कारवाई करण्यात यावी. स्टार बस प्रकरणात तत्कालीन महापौरांनी २९ महिन्यापूर्वी सभागृहात निर्णय दिला होता. परंतु अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. कृषी विद्यापीठाच्या जागेवरील अतिक्रमण प्रकरणात महापालिकेने शासनाकडे प्रस्तावच पाठविला नाही. ओसीडब्ल्यू कंपनीने अपक्ष नगरसेवकांचा अपमान केला. वारंवार मागणी करूनही या कंपनीच्या विरोधात कारवाई होत नाही. केबल डक्ट प्रकरणात ५० कोटींचा दंड आकारण्यात आल होता. नंतर १४ लाखांवर तडजोड करण्यात आली. अशा महत्त्वाच्या विषयावर निर्णयानुसार कारवाई होत नसल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.(प्रतिनिधी) नगरसेवकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव प्रलंबित महापालिकेच्या नगरसेवकांना दरमहा २५हजार रुपये मानधन देण्याबाबतचा प्रस्ताव सभागृहाने एकमताने पारित केला होता. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. परंतु यावर अद्याप निर्णय झालेला नाही. हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याची माहिती दटके यांनी दिली. ...तर सभागृह चालू देणार नाही ६-७ महिन्यांपूर्वी नागरिकांच्या प्रश्नासाठी विरोधकांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली होती. कामकाज तहकूब होत होते. यावर महापौरांनी सभागृहातील निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देऊ न यावर तोडगा काढला होता. परंतु त्यानंतरही सभागृहाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. निर्णयाची अंमलबजावणीच होत नसेल तर न्याय कसा मिळणार. दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही. तोपर्यत सभागृह चालू देणार नाही. - विकास ठाकरे, विरोधीपक्षनेते महापालिका गोंधळामागे राजकारण उखडलेल्या रस्त्यांच्या चौकशीसाठी सर्वपक्षीय समिती गठित करण्यात आलेली आहे. समितीने आयुक्तांना अहवाल सादर केल्यानंतर कारवाई करतील. याबाबतचा अहवाल सभागृहात ठेवला जाणार आहे. केबल डक्ट प्रकरणातील अहवाल अद्याप सादर करण्यात आलेला नाही. विविध प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई होणार आहे. सभागृहात फलक झळकावल्यासंदर्भात सचिवांना उचित निर्र्देश दिले आहे. निवडणुका विचारात घेता विरोधक गोंधळ घालून राजकारण करीत आहे. - प्रवीण दटके, महापौर