शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या विरोधात काँग्रेस आक्रमक

By admin | Updated: December 20, 2015 02:55 IST

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार व भाजपने षङ्यंत्र रचल्याचा आरोप ...

देवडिया भवनासमोर निदर्शने : पोलिसांनी कार्यक र्त्यांना ताब्यात घेतलेनागपूर : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार व भाजपने षङ्यंत्र रचल्याचा आरोप करीत शहर व जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते शनिवारी दुपारी रस्त्यावर उतरले. निदर्शने व रास्ता रोको करीत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. शहर काँग्रेसने चिटणीस पार्क परिसरात रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक जाम झाली होती. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह १०० वर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.शहर काँग्रेस कमिटीतर्फे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात देवडिया कॉंग्रेस भवनासमोर सुमारे तीन तास जोरदार निदर्शने केली. यानंतर कार्यक र्त्यांनी अग्रसेन चौकात रास्तारोको केला. यामुळे काही वेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. हातात तिरंगी झेंडे घेऊ न कार्यक र्त्यांनी सोनियाजी, राहुलजी आगे बढो हम तुम्हारे साथ है, हुकूमशाही मानसिकतेचा निषेध असो, अशा जोरदार घोषणा दिल्या. सोनिया गांधी व राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात भाजपकडून सूडभावनेतून लक्ष्य केले जात आहे. या घटनेत काँग्रेस कार्यकर्ते सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे विकास ठाकरे यांनी सांगितले. आंदोलनात नगरसेवक प्रशांत धवड, संजय महाकाळकर, सरचिटणीस अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, अ‍ॅड. अभिजित वंजारी, राजेंद्र काळमेघ, अजय हिवरकर, राजू व्यास, डॉ. गजराज हटेवार, बंडोपंत टेंभूर्णे, कमलेश समर्थ, तानाजी वनवे,राकेश पन्नासे, गुलाबराव लाकूडकर, जयंत लुटे, रत्नाकर जयपूरकर, परमेश्वर राऊत, सुभाष खोडे, सूर्यकांत भगत, डॉ. मीनाक्षी ठाकरे, विजय बाभरे, तुफैल अशर, सेवादलाचे रामगोविंद खोबागडे, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, दीपक कापसे, देवा उसरे, योगेश तिवारी, अरुण डवरे, वासुदेव ढोके, नितीश ग्वालबंशी, प्रसन्न जिचकार, पंकज निघोट, किशोर जिचकार, घनश्याम भांगे, दीपक वानखेडे, नयना झाडे, सुजाता कोंबाडे, हर्षला साबळे, सिंधू उईके, शीला मोहोड, रेखा बाराहाते, मालु वनवे, भावना लोणारे, उज्ज्वला बनकर, प्रेरणा कापसे आदींनी भाग घेतला. जिल्हा काँग्रेसचीही निदर्शनेनागपूर : जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे यांच्या नेतृत्वात माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या उपस्थितीत जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या समोरील रस्ता काही वेळासाठी जाम केला. या वेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात माजी आ. एस.क्यु. जमा, बाबुराव तिडके, सुरेश भोयर, बाबा आष्टनकर, मुजीब पठाण, कुंदा राऊत, शांता कुमरे, अनिल रॉय, बंटी शेळके, नरेंश बर्वे, दयाराम भोयर, हर्षवर्धन निकोसे, कृष्णा यादव, मनोज तितरमारे, नंदाताई नारनवरे, शकुर नागानी, भीमराव कडू, कुंदा आमधरे, सुनील जामगडे, उपासराव भुते, गंगाधर रेवतकर, अरुण हटवार, प्रकाश वसू, किशोर मिरे, राजकुमार तिडके आदींनी भाग घेतला. युवक काँग्रेसने काढली पदयात्रायुवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष बंटी शेळके व ग्रामीण अध्यक्ष अनिल रॉय यांच्या नेतृत्त्वात युवक काँग्रेसतर्फे पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रा टिळक पुतळा, महाल येथील भाजप कार्यालयासमोर पोहचली असता भाजप विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. प्रवीण पोटे, सचिन किरपान, राजेश खंगारे, शुभम मोटघरे, मोतीराम मोहाडीकर, फिरोज अन्सारी संदीप यादव आदींनी आंदोलनात भाग घेतला. (प्रतिनिधी)