सीबीएसईची मनमानी : विद्यार्थी संकटातआशिष दुबे ल्ल नागपूरविदर्भातीलपदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हजारो विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (नेट) अर्ज करायचा की नाही, अशी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळेच मोठ्या संख्येवर उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज केलेला नाही. परिणामी २८ जून रोजी होणाऱ्या नेटच्या परीक्षेत सहभागी होणाऱ्या विदर्भातील परीक्षार्थ्यांची संख्या घटेल, अशी शंका व्यक्त केली जात आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) च्या वतीने यंदाही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) नेट परीक्षा आयोजित करीत आहे. या परीक्षेसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून आहे. सीबीएसईने परीक्षा केंद्राच्या प्रारूपमध्येही मोठा बदल केलेला आहे. विद्यार्थी याला सीबीएसईची मनमानी म्हणत आहेत. नवीन बदलानुसार केंद्र निवडीसाठी विद्यार्थ्यांना चार पर्याय देण्यात आले आहेत. या पर्यायानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी चार वेगवेगळ्या शहरांची निवड करणे करणे सक्तीचे करण्यात आले आहे. डिसेंबर २०१४ पर्यंत असे कोणतेही पर्याय नव्हते. या परीक्षेचे नियंत्रण करणाऱ्या विद्यापीठाच्या सीमा क्षेत्रातील केंद्र विद्यार्थ्यांना दिले जात होते. नागपूर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नागपूर आणि अमरावती क्षेत्रातील विद्यार्थ्याना अमरावतीतील परीक्षा केंद्र दिले जात होते. या नवीन बदलामुळे हे ठोस सांगणे कठीण आहे की, विद्यार्थ्यांना नेमके कुठले केंद्र मिळेल. चार पर्यायापैकी कुठल्याही शहरातील केंद्र दिले जाऊ शकते. नागपूर व्यतिरिक्त औरंगाबाद, मुंबई किंवा अन्य शहरात परीक्षा केंद्र दिले तर तेथे परीक्षा देण्यास जायचे कसे, अशी शंका निर्माण झाली आहे. या शंकेमागे आणखी एक कारण असे की, सीबीएसईमार्फतच जेईई -मुख्य आणि एआयपीएमटी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या नागपुरातील विद्यार्थ्यांना देशाच्या कोणत्याही ठिकाणी परीक्षा केंद्र दिले जाते. या परीक्षेसाठीही असेच झाले तर विद्यार्थ्यांना नाईलाजाने परीक्षेपासून वंचित व्हावे लागेल.
‘नेट’ सेंटरच्या प्रारूपावरून संभ्रम
By admin | Updated: May 5, 2015 02:03 IST