शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

‘नवोदय’ प्रवेशपूर्व परीक्षेत सावळागोंधळ : ५६ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 21:39 IST

जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेशपूर्व परीक्षा शनिवारी (दि. ६) घेण्यात आली. या परीक्षेसाठी देवलापार व रामटेक अशी दोन परीक्षा केंद्र देण्यात आले होते. मात्र, देवलापार परिसरातील काही विद्यार्थ्यांना रामटेक आणि रामटेक परिसरातील विद्यार्थ्यांना देवलापार येथील परीक्षा केंद्र देण्यात आल्याने घोळ झाला. याच घोळामुळे दोन्ही परीक्षा केंद्रांवरील प्रत्येकी २८ विद्यार्थी (एकूण ५६) या परीक्षेपासून वंचित राहिले आहेत.

ठळक मुद्देपरीक्षा केंद्र बदलल्याने घोळ

कैलास निघोट। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (देवलापार) : जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेशपूर्व परीक्षा शनिवारी (दि. ६) घेण्यात आली. या परीक्षेसाठी देवलापार व रामटेक अशी दोन परीक्षा केंद्र देण्यात आले होते. मात्र, देवलापार परिसरातील काही विद्यार्थ्यांना रामटेक आणि रामटेक परिसरातील विद्यार्थ्यांना देवलापार येथील परीक्षा केंद्र देण्यात आल्याने घोळ झाला. याच घोळामुळे दोन्ही परीक्षा केंद्रांवरील प्रत्येकी २८ विद्यार्थी (एकूण ५६) या परीक्षेपासून वंचित राहिले आहेत.रामटेक तालुक्यातील एकूण ४९९ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ‘ऑनलाईन’ अर्ज सादर केले होते. यात देवलापार परिसरातील १४९ आणि रामटेक परिसरातील ३५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या परीक्षेसाठी दरवर्षी देवलापार येथील स्वामी विवेकानंद विद्यालय आणि रामटेक येथील समर्थ विद्यालय, अशी दोन परीक्षा केंद्रे दिली जातात. देवलापार परिसरातील विद्यार्थी देवलापार येथे आणि रामटेक परिसरातील विद्यार्थी रामटेक येथील परीक्षा केंद्रावर सदर परीक्षा देतात.पूर्वी या परीक्षेचे अर्ज ‘ऑफलाईन’ पद्धतीने भरले जायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र त्यांच्या शाळांमध्ये पाठविण्याची व्यवस्था केली जायची. यावर्षी ‘ऑनलाईन’ पद्धतीने अर्ज भरून घेण्यात आले; शिवाय विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेशपत्रही संबंधित ‘साईट’वरून ‘डाऊनलोड’ करावे लागले. प्रवेशपत्र ‘डाऊनलोड’ करण्याचे काम आठवडाभरापासून सुरू होते.यात देवलापार परिसरातील काही विद्यार्थ्यांना रामटेक आणि रामटेक परिसरातील काही विद्यार्थ्यांना देवलापार येथील परीक्षा केंद्र देण्यात आले. विशेष म्हणजे, एकाच शाळेतील दोन विद्यार्थ्यांना रामटेक व देवलापार अशी दोन वेगवेगळी परीक्षा केंद्रे देण्यात आली. केंद्र संचालक म्हणून दीपक गिरधर यांनी रामटेक व वासुदेव निघोट यांनी देवलापार परीक्षा केंद्रावर जबाबदारी सांभाळली.शाळा एक अन् परीक्षा केंद्र दोनअनेकांनी उशिरा प्रवेशपत्र ‘डाऊनलोड’ केल्याने त्यांना परीक्षा केंद्राची माहिती उशिरा मिळाली. परीक्षा केंद्रात बदल करण्यात आल्याने देवलापार परिसरातील विद्यार्थ्यांना रामटेक येथे जाण्यासाठी आणि रामटेक परिसरातील विद्यार्थ्यांना देवलापार येथे येण्यासाठी ४० ते ६० कि.मी.चा प्रवास करावा लागला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कट्टा येथील एका विद्यार्थिनीला देवलापार आणि दुसरीला रामटेक येथील परीक्षा केंद्र देण्यात आले. मात्र, दोघीही देवलापार येथील परीक्षा केंद्रावर पोहोचल्या. यातील अंकिता वरठी हिला तिचे परीक्षा केंद्र रामटेक येथे असल्याचे ऐनवेळी कळले. त्यामुळे तिला वेळेवर रामटेक येथू जाऊन परीक्षा देणे शक्य नसल्याने परीक्षेपासून वंचित राहावे लागले. शिवाय, मौदा तालुक्यातील काही शाळांच्या विद्यार्थ्यांना रामटेक येथे परीक्षा केंद्र दिले होते.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी