लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे (आरएसएस) असलेली अवैध शस्त्रे जप्त करण्यात यावी, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या शहर कार्यकारिणीतर्फे सोमवारी मोर्चा काढण्यात आला.संविधान चौक येथून सोमवारी दुपारी १.३० वाजता महासंघाचे प्रदेश महासचिव सागर डबरासे, शहर अध्यक्ष रवी शेंडे, राजू लोखंडे, जिल्हा महासचिव नीतेश जंगले यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा सिव्हिल लाईन्स येथील वहतूक आयुक्त कार्यालयासमोरच रोखण्यात आला. यादरम्यान मोर्चेकऱ्यांनी जोरदार नारेबाजी केली. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते की, आरएसएसकडे मोठ्या प्रमाणावर अवैध शस्त्रे आहेत. याची सखोल चौकशी व्हावी. विना परवाना असलेली शस्त्रे जप्त करावी. यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. यानंतर मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना सादर करण्यात आले.मोर्चात मिलिंद मेश्राम, वनमाला उके, भूषण भस्मे, भोला शेंडे, राजेश भंडारे, विशाल गोंडाणे, गौतम पाटील, सचिन मेश्राम, विशाल वानखेडे, धर्मपाल वंजारी, निर्भय बागडे, राजेंद्र मेश्राम, आशिष हुमणे, आशय पगारे आदी उपस्थित होते.
‘आरएसएस’कडील अवैध शस्त्रे जप्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:47 IST
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे (आरएसएस) असलेली अवैध शस्त्रे जप्त करण्यात यावी, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या शहर कार्यकारिणीतर्फे सोमवारी मोर्चा काढण्यात आला.
‘आरएसएस’कडील अवैध शस्त्रे जप्त करा
ठळक मुद्देभारिप बहुजन महासंघाचा मोर्चा : तीव्र आंदोलन करण्याचा इशारा