शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न लावता फिरणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 21:57 IST

तोंडावर मास्क न लावता सर्वत्र बिनबोभाट फिरणाऱ्या बेजबाबदार आणि उपद्रवी मंडळींवर पोलिसांनी कारवाईचा धडाका लावावा, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी कारवाई वाढवावी : ‘कोरोना’ला नियंत्रणात आणणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तोंडावर मास्क न लावता सर्वत्र बिनबोभाट फिरणाऱ्या बेजबाबदार आणि उपद्रवी मंडळींवर पोलिसांनी कारवाईचा धडाका लावावा, अशी मागणी होत आहे. कोरोनाने सर्वत्र प्रचंड थैमान घातले आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या सारखी वाढतच आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहे. सरकार, प्रशासन वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी आणि पोलीस आपापल्या परीने कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून जनजागरणही केले जात आहे. तोंडावर मास्क लावा, वेळोवेळी साबणाने हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा, अशा सूचना दिल्या जात आहे. बहुतांश मंडळी या सूचनांचे काटेकोर पालनही करीत आहे. मात्र काही बेजबाबदार मंडळी या सूचनांकडे दुर्लक्ष करून स्वत:चा जीव धोक्यात घालण्यासोबतच इतरांचेही आरोग्य धोक्यात आणू पाहत आहेत.नागपुरात वेगवेगळ्या भागात तोंडावर मास्क न लावता फिरणारे उपद्रवी मोठ्या प्रमाणात दिसतात. पोलिसांनी या बेजबाबदारांविरुद्ध आता धडाकेबाज कारवाई करावी आणि कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव रोखावा, अशी संतप्त मागणी जनसामान्यातून पुढे आली आहे. दरम्यान मास्क न लावता बिनबोभाट अनेक जण फिरत असल्याची बाब लक्षात आणून दिली असता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अशावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर