शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील दुकाने, बांधकाम आणि शासकीय कार्यालयांना सशर्त परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 00:17 IST

नागपूर शहरात जीवनावश्यक वस्तूंसह निवासी संकुलातील आणि रहिवासी परिसरातील फक्त होजियरी आणि स्टेशनरी दुकाने, इन सीटू बांधकाम कार्य आणि १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यालये सुरू करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी घेतला.

ठळक मुद्देमनपाचा निर्णय : शहरातील सहा झोनमध्ये शिथिलता, चार झोनमधील निर्बंध कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. शासनाने घोषित नवीन मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने नागपूर शहरात जीवनावश्यक वस्तूंसह निवासी संकुलातील आणि रहिवासी परिसरातील फक्त होजियरी आणि स्टेशनरी दुकाने, इन सीटू बांधकाम कार्य आणि १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यालये सुरू करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी घेतला.शहरातील नऊ प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) व मनपाचे गांधीबाग, सतरंजीपुरा, आसीनगर आणि मंगळवारी हे चार प्रशासकीय झोन वगळता लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, लकडगंज या सर्व सहाही झोनसाठी हे आदेश लागू राहणार आहेत. मात्र संपूर्ण शहरातील खासगी कार्यालयांसह दारूची दुकाने, वाईन शॉप, पानठेले, शॉपिंग मॉल, सलून, स्पा आदी सर्व बंदच राहणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.शहरात निर्माण होणारा कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी तिसरे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यामध्ये नागरिकांना केवळ काही गोष्टींसाठीच शिथिलता देण्यात आली आहे. आयुक्तांनी जारी केलेल्या निर्णयामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टींसाठी त्यांनी शिथिलता दिली आहे. सहा झोनमध्ये इन सीटू बांधकामासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी बांधकामस्थळी कामगारांच्या निवासाची व्यवस्था असणे आवश्यक आहे. याशिवाय नमूद क्षेत्रातील शासकीय कार्यालये १० टक्के उपस्थितीसह सुरू करण्याबाबतसुद्धा परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सर्व संबंधितांना शारीरिक अंतराचे पालन करणे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे.शहरात कोविडची स्थिती लक्षात घेता संबंधित शिथिलता देण्याबाबत टप्प्याटप्प्याने पुढील आदेश जारी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अनुज्ञेय केलेल्या शिथिलतेबाबत नव्याने कोणतीही परवानगी घेण्याची गरज नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी शासनाने नेमून दिलेल्या एस.ओ.पी. चे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे