घरफोडीत महिलेला सशर्त जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:06 AM2021-05-01T04:06:41+5:302021-05-01T04:06:41+5:30

---------------------- खून प्रकरणात आरोपीला जामीन नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खून प्रकरणातील आरोपी राजेश नारायण सरनाईकला सशर्त ...

Conditional bail for burglary woman | घरफोडीत महिलेला सशर्त जामीन

घरफोडीत महिलेला सशर्त जामीन

Next

----------------------

खून प्रकरणात आरोपीला जामीन

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खून प्रकरणातील आरोपी राजेश नारायण सरनाईकला सशर्त जामीन मंजूर केला. आरोपी कवठा, ता़ रिसोड, जि. वाशीम येथील रहिवासी आहे. मयताचे नाव रवी सरनाईक हाेते. १९ नोव्हेंबर २०२० रोजी राजेशसह इतर आरोपींनी रवीला काठ्यांनी व हातबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी पोलीस तक्रार आहे. आरोपीतर्फे अ‍ॅड. मिर नगमान अली यांनी कामकाज पाहिले़ त्यांनी राजेशला या प्रकरणात फसविण्यात आल्याचा दावा केला.

-----------------

वकिलांचा वैद्यकीय विमा काढा

नागपूर : कोरोनामुळे वकिलांचे लागोपाठ मृत्यू होत आहेत़ अनेक वकिलांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे़ या कठीण काळात वकिलांचे संरक्षण करण्यासाठी त्यांचा वैद्यकीय विमा काढण्यात यावा, यासह विविध मागण्यांसह बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल गोवारदीपे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे़ मृत्यू झालेल्या वकिलांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये भरपाई देण्यात यावी. रुग्णालयात भरती असलेल्या वकिलांना ३ लाख रुपये देण्यात यावे. वकिलांसाठी जीवनरक्षक औषधांचा पुरवठा करण्यात यावा, यासह अन्य काही मागण्यांचा निवेदनात समावेश आहे़ निवेदन देणा-या शिष्टमंडळात अ‍ॅड. योगेश मंडपे, अ‍ॅड. मंगेश मून, अ‍ॅड. विलास डोंगरे, अ‍ॅड. ममता रामटेके, अ‍ॅड. पल्लवी खरे आदींचा समावेश होता़

Web Title: Conditional bail for burglary woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.