शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

२७ चिमुकल्यांवर कॉक्लीअर इम्प्लांट : राज्यात शासकीय रुग्णालयात मेयो आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:31 IST

जन्मजात श्रवणदोषावर ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ हा अद्ययावत पर्याय आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) ‘कान, नाक, घसा (ईएनटी) विभागाने शनिवारी चार बालकांवर ही शस्त्रक्रिया झाली. १ जुलै रोजी पुन्हा सहा बालकांवर ही शस्त्रक्रिया होऊन ‘इम्प्लांट’चा २७ वा आकडा गाठला जाणार आहे.

ठळक मुद्देमूकबधिरता होत आहे दूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जन्मजात श्रवणदोषावर ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ हा अद्ययावत पर्याय आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) ‘कान, नाक, घसा (ईएनटी) विभागाने शनिवारी चार बालकांवर ही शस्त्रक्रिया झाली. १ जुलै रोजी पुन्हा सहा बालकांवर ही शस्त्रक्रिया होऊन ‘इम्प्लांट’चा २७ वा आकडा गाठला जाणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येत ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ करून मूकबधिरता दूर करणारे राज्यातील हे पहिले रुग्णालय ठरले आहे.ज्या चिमुकल्यांना जन्मापासून ऐकू येत नव्हते. श्रवणदोष असल्याने त्यांनी जगातला कोणताच आवाज ऐकला नव्हता. पैसे नसल्याने महागडे ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ खरेदी करणेही शक्य नव्हते. अशांसाठी मेयोचे ‘ईएनटी’ विभागातील ‘कॉक्लीअर इम्प्लांट केंद्र’ आधार ठरत आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्या मार्गदर्शनात विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांच्या पुढाकारामुळे कॉक्लीअर इम्प्लांट केंद्राला २०१७ मध्ये सुरुवात झाली. विदर्भातील एकमेव शासकीय रुग्णालयात सुरू झालेल्या या केंद्राचा फायदा गरजूंना होऊ लागला आहे. सुरुवातीला चार रुग्णांवर यशस्वी ‘इम्प्लांट’ केल्यानंतर पुढे हा आकडा वाढतच गेला. शनिवार १ जून रोजी पुन्हा चार बालकांवर हे ‘इम्प्लांट’ करण्यात आल्याने हा आकडा २१ वर पोहचला आहे. पद्मश्री डॉ. मिलिंद कीर्तने यांच्या देखरेखीखाली झालेल्या सर्वच शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना ‘स्पीच थेरपी’ देऊन त्यांना बोलतेही केले जात आहे.श्रवण चाचणीची पहिली ओपीडीमेयोच्या ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. वेदी यांनी पहिली श्रवण चाचणी ओपीडी सुरू केली आहे. यामुळे मेयो रुग्णालयात जन्म घेतलेल्या बालकांची श्रवण चाचणी करून दोष आढळल्यास त्याला उपचाराखाली आणले जात आहे. शासकीय रुग्णालयांमध्येही हा पहिलाच उपक्रम आहे. डॉ. वेदी यांच्यानुसार, जन्मजात बहिरेपणाचे निदान होऊन ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया झाल्यास श्रवणदोष दूर करण्याचा यशाचा टक्का वाढतो. यामुळे ही ओपीडी श्रवणदोष दूर करणारे एक माध्यम ठरत आहे.१५ बालकांना शस्त्रक्रियेची प्रतीक्षाडॉ. वेदी म्हणाले, श्रवणदोष दूर करणारे हे केंद्र कमी वेळात प्रसिद्धीस आले आहे. यामुळे दिवसेंदिवस श्रवणदोषाच्या रुग्णांत वाढ होऊ लागली आहे. ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ हे महागडे यंत्र आहे. यामुळे गरजू रुग्णांना निवडून त्यावर ही शस्त्रक्रिया केली जात आहे. सध्याच्या स्थितीत १५ बालके या शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)