शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांना सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 21:24 IST

मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणाऱ्या  शेतकऱ्यांना दिलासा देत ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी ३० हजाराची थकबाकी असल्यास सुरुवातीला ३ हजार व ३० हजारापेक्षा अधिक थकबाकी असल्यास ५ हजार रुपये भरण्याची सवलत बुधवारी जाहीर केली आहे.

ठळक मुद्देऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकारतीन व पाच हजार रुपये भरून योजनेत सहभागवीज देयकाच्या दुरुस्तीसाठी फीडरनिहाय शिबिर

आॅनलाईन लोकमतनागपूर : मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणाऱ्या  शेतकऱ्यांना दिलासा देत ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी ३० हजाराची थकबाकी असल्यास सुरुवातीला ३ हजार व ३० हजारापेक्षा अधिक थकबाकी असल्यास ५ हजार रुपये भरण्याची सवलत बुधवारी जाहीर केली आहे. ही रक्कम ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत भरावयाची आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना वीजदेयकाची दुरुस्ती करावयाची आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक फिडरनिहाय वीजदेयक दुरुस्ती शिबिराचे आयोजन १ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०१७ या कालावधीत महावितरणतर्फे करण्यात येणार आहे.मुंबईत महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड येथे बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत ऊर्जा सचिव अरविंद सिंह, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार व महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे उपस्थित होते. ज्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे खंडित करण्यात आलेला आहे अशा शेतकऱ्यांनी पैसे भरताच त्यांचा वीजपुरवठा तात्काळ जोडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणाºया ज्या शेतकऱ्यांना आपली देयके वाढून आली आहेत असे वाटत असेल त्यांनी फिडरनिहाय आयोजित शिबिरात सहभाग घेऊन आपली देयके तपासून घ्यावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे.कृषीपंपांना थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ ची घोषणा ३० आॅक्टोबर २०१७ ला ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी जाहीर केली होती. या योजनेची मुदत ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत असून या योजनेत सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहनही ऊर्जामंत्र्यांनी केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी