शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

सीएए-एनआरसी विरोधात भारत बंदला नागपुरात संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 20:50 IST

भारत मुक्ती मोर्चा तसेच बहुजन क्रांती मोर्चा यांनी सीएए-एनआरसी विरोधात केलेल्या भारत बंदच्या आवाहनाला बुधवारी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देउत्तर, पूर्व आणि मध्य नागपुरात दिसला परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत मुक्ती मोर्चा तसेच बहुजन क्रांती मोर्चा यांनी सीएए-एनआरसी विरोधात केलेल्या भारत बंदच्या आवाहनाला बुधवारी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. उत्तर, पूर्व आणि मध्य नागपुरात बंदचा चांगला परिणाम दिसून आला तर पश्चिम, दक्षिण आणि दक्षिण-पश्चिममध्ये मात्र संमिश्र प्रतिसाद होता. दुकाने व प्रतिष्ठाने बंद होती. तसेच शाळा, कॉलेज, शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांची संख्या रोडावल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी स्कूल ऑटो बंद होते. मॉलमध्येही फारसे ग्राहक नव्हते.

उत्तर नागपूरउत्तर नागपुरातील प्रमुख व्यापारी भागातील प्रतिष्ठाने दिवसभर बंद होती. कमाल चौक, लष्करीबाग, १० नंबर पूल, वैशालीनगर रोड, आसीनगर, इंदोरा चौक, टेका नाका, सिद्धार्थनगर, यशोधरानगर, गरीबनवाजनगर, राणी दुर्गावती चौक ते मोहम्मद रफी चौकपर्यंतची दुकाने बंद होती. उत्तर नागपुरातील पाचपावली उड्डाण पुलावरून वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. उड्डाण पुलावर उभे राहून कार्यकर्ते भारत बंदच्या घोषणा देत होते. जरीपटका परिसरातील बाजारातही संमिश्र प्रतिसाद दिसून आला. टेकानाका चौकात दुपारी कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.मध्य नागपूरमोमीनपुरा मार्केट पूर्णपणे बंद होते. वस्त्यांमधील दुकाने सुद्धा बंद ठेवण्यात आली होती. गांजाखेत चौकातील व्यापारिक प्रतिष्ठानाचे शटर बंद होते. महालमधील शिवाजी चौक ते राम कुलर चौकापर्यंत दुकाने बंद होती. याशिवाय महालसह गांधीबाग, जागनाथ बुधवारी, इतवारी, चिटणीस पार्क, गणेशपेठ, सीए, रोड येथे बंदचा समिश्र प्रतिसाद होता.पूर्व नागपूरहसनबाग, सतरंजीपुरा, लकडगंज आदी ठिकाणची दुकाने बंद होती तर वर्धमाननगर, पारडी, एचबी टाऊन चौकात बंदचा संमिश्र प्रतिसाद होता.पश्चिम नागपूरपश्चिम नागपुरातील जाफरनगर, अवस्थी चौक, अहबाब कॉलनी, पेन्शननगर येथे प्रतिष्ठाने बंद होती. बोरगाव, गिट्टीखदान, सीताबर्डी, रामनगर, धरमपेठ येथे संमिश्र प्रतिसाद होता.गोळीबार चौकात गोंधळ
गोळीबार चौकातील बहुतांश दुकाने सकाळपासून बंद ठेवण्यात आली होती. परंतु काही दुकाने सुरू असल्याने बंदचे आवाहन करीत कार्यकर्त्यांची गर्दी वाढत गेली. दुकाने सुरू दिसल्याने गोंधळ झाला. हा गोंधळ वाढल्याने पोलिसांनी येथे तगडा पोलीस बंदोबस्त वाढवला. गोंधळ होताच दुकानदारांनी आपापली प्रतिष्ठाने बंद केली. रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्त कायम होता.स्कुल, कोचिंग क्लासेसवरही परिणामअनेक स्कूल ऑटो चालकांनी बंदच्या समर्थनार्थ ऑटोरिक्षा बंद ठेवले होते. त्यामुळे शाळेवर परिणाम दिसून आला. तर काही कोचिंग क्लासेस चालवणाऱ्यांनी स्वत:हूनच वर्ग बंद ठेवले होते. जे शिकवणी वर्ग सुरू होते. तिथे सुद्धा विद्यार्थ्यांची संख्या कमी होती.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBharat Bandhभारत बंदnagpurनागपूर