शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानना कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
2
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
3
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
4
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
5
सासरेबुवा घरी घेऊन आले २ सूना; लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच झाल्या गायब अन्... समोर आलं धक्कादायक सत्य
6
Video : सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, गॅलरीमध्ये रंगल्या गप्पा, भेटीचं कारण काय?
7
दर महिना ७० हजार सॅलरी पण हाती शिल्लकच राहत नाही; टेक प्रोफेशनल युवकानं शेअर केला अनुभव
8
Platinum Investment: सोने-चांदीच्या किंमती आवाक्याबाहेर, प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करणे चांगला पर्याय आहे का?
9
Video: हायकोर्टच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान वकीलाचा महिलेला Kiss; व्हिडिओ व्हायरल...
10
Virat Kohli Property: विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?
11
VIRAL : बाब्बो! ९३व्या वर्षी बाबा झाला हा व्यक्ती; बायको ५६ वर्षांनी लहान! लगेच दुसऱ्या बाळाचाही विचार केला सुरू
12
Virat Kohli: "ज्यावेळी तुम्ही हार मानता..." किंग कोहलीची पोस्ट चर्चेत; जाणून घ्या सविस्तर
13
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
14
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
15
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
16
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...
17
पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; २७% प्रीमिअमसह बंपर लिस्टिंग, तुमच्याकडे आहे?
18
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
19
बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
20
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका

नागपुरात वंचितच्या बंदला संमिश्र प्रतिसाद : ठिकठिकाणी रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 21:47 IST

वंचित बहुजन आघाडीतर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला नागपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही काळ बाजारपेठा बंद राहिल्यानंतर पुन्हा सुरू झाल्या होत्या. शहरातील अनेक भागात रॅली काढून निदर्शनेही करण्यात आली.

ठळक मुद्देसीएए, एनआरससह केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वंचित बहुजन आघाडीतर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला नागपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही काळ बाजारपेठा बंद राहिल्यानंतर पुन्हा सुरू झाल्या होत्या. खरबदारी म्हणून काही शाळांनीही विद्यार्थ्यांना सुट्टी दिली. शहरातील अनेक भागात रॅली काढून निदर्शनेही करण्यात आली. या बंदमध्ये विविध सामजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. नागपुरात हा बंद शांततेत पार पडला.

केंद्र सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), यासोबतच येऊ घातलेल्या एनपीआर व एनआरसी तसेच देशातील बुडालेली अर्थव्यवस्था, केंद्र सरकारच्या चुकीचे आर्थिक धोरण, शासकीय संस्थांचे होत असलेले खासगीकरण याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या बंदला विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दिला होता.वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष रवी शेंडे यांच्या नेतृत्त्वात सीताबर्डी येथून रॅली काढण्यात आली. आनंद टॉकिजमार्गे संपूर्ण सीताबर्डी भागात ही रॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येन कार्यकर्ते उपस्थित होते. रॅलीच्या माध्यमातून बाजारपेठ, दुकान बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. याला दुकानदारांनी प्रतिसादही दिला.भरत लांडगे यांच्या नेतृत्वात इंदोरा चौक येथील कार्यालयातून रॅली काढण्यात आली. इंदोरा चौक, कमाल चौक, आवळे बाबू चौक, लष्करीबागपासून पुन्हा कमाल चौक ते इंदोरा चौक अशी ही रॅली निघाली. या दरम्यान कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.यात वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद मेश्राम, आनंद चवरे, भरत लांडगे, गोवर्धन भेले, प्रशांत नारनवरे, गौतम शेंडे, प्रशांत खोब्रागडे, बबन बुरबुरे, प्रवीण पाटील, भोला शेंडे, संघपाल गडेकर, रोशन बेहरे, सतीश मोटघरे, विनीत मेश्राम, अविराज थूल, जीवन ऊके, लहानू बंसोड, सतपाल सिंह विर्दी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.दक्षिण पश्चिम नागपुरातील लाँग मार्च चौकातून रॅली काढण्यात आली. बैद्यनाथ चौक, गणेशपेठ बस स्टेशन, मेडिकल चौक, जाटतरोडी चौक, मोक्षधाम चौक परिसरात बंद पाळण्यात आला. सुभाष नगर, माटे चौक, गोपाल नगर, प्रतापनगर आदी भागात रॅली काढण्यात आली व बंद पाळण्यात आला. पश्चिम नागपुरात जाफर नगर, अनंतनगर, अवस्थी चौक येथे शांततेत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते राजू लोखंडे, प्रा. रमेश पिसे, संजय हेडाऊ, राहूल वानखेडे, मिलिंद मेश्राम, बाळू हरखंडे, अश्विन मेश्राम, गौतम पिल्लेवान, धर्मपाल लामसोंगे, सती बावने, सुजाता सुरडकर, शुभम ढेंगरे, अंकुश मोहिले, धम्मा धाबर्डे, प्रदीप गणवीर, सिध्दांत पाटील आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यातदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नागपूर शहर युवा अध्यक्ष भोला शेंडे यांच्यासह चार कार्यकर्त्यांना लकडगंज पोलिसांनी ताब्यात घेतले. इंदोरा चौकात आंदोलन करीत असताना त्यांना ताब्यात घेतले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकagitationआंदोलन