शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 14:37 IST

आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या ९ आॅगस्टच्या क्रांती ठोक मोर्चा आणि आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आंदोलनकर्त्यांनी शहराच्या विविध भागात फिरून दुकाने बंद केली.

ठळक मुद्दे सकल मराठा समाजाचे क्रांती ठोक आंदोलनबाजारपेठा बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या ९ आॅगस्टच्या क्रांती ठोक मोर्चा आणि आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आंदोलनकर्त्यांनी शहराच्या विविध भागात फिरून दुकाने बंद केली. त्यामुळे सीताबर्डी, महाल, इतवारी, गांधीबाग, मस्कासाथ, सक्करदरा या भागातील बाजारपेठा बंद होत्या. शिवाय शहर बस बंद असल्यामुळे प्रवाशांना फटका बसला.सकाळी १० वा महाल गांधीगेट येथे महाआरतीनंतर आंदोलनाला सुरुवात झाली. तत्पूर्वी मेजर राणे, उमेश चौबे आणि काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी हजारो मराठा समाजबांधव आणि महिला उपस्थित होत्या. त्यांनी शासनाविरोधात नारेबाजी करून आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी केली.राजे मुधोजी भोसले म्हणाले, आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घेण्यात येणार आहे. युवकांना तसे आवाहनही करण्यात आले आहे. पुढील पिढी शिक्षित होण्यासाठी मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. शासनाने ठरविल्यास आरक्षण देण्यास काहीही अडचण नाही. यावेळी अन्य नेत्यांनी भाषण देऊ नये, अशी मागणी युवकांनी केली.

  •  चौकाचौकात धरणे आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी.
  •  आंदोलनाचा फटका शहरातील मुख्य बाजारपेठांना बसला. महाल, गांधीबाग, इतवारी, मस्कासाथ, सराफा बाजार, सीताबर्डी, कॉटन मार्केट, सुभाष रोड या भागातील दुकाने सकाळी उघडली नाहीत.
  • -महालातील महापालिकेच्या टाऊन हॉलमध्ये पालकमंत्र्यांची पाणी प्रश्नावर बैठक सुरू असताना आंदोलक सभागृहाबाहेर धडकले आणि शासनाविरोधात नारेबाजी सुरू केली.
  •  आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा महिला कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळा हातात घेऊन गांधीगेटपासून टिळक पुतळ्यापर्यंत आंदोलन आणि नारेबाजी केली. पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतला.
  • आंदोलकर्त्या महिलांनी महाल, गणेशपेठ, सुभाष चौक या चौकात मानवी साळखी तयार करून ठिय्या आंदोलन केले आणिवाहतूक बंद पाडली.
  •  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एसटी वाहतूक बंद करण्याच्या सूचना केल्या. सकाळी एसटीची वाहतूक सुरू होती. गणेशपेठ येथील एसटी स्थानकातून बस बाहेर निघताच कार्यकर्त्यांनी चाकातील हवा सोडली. त्यामुळे एसटी वाहतूक बंद झाली.
  •  बहुतांश शाळांनी गुरुवारी सुटी जाहीर केली. शिक्षण विभागाने अधिकृत सुटी जाहीर केलेली नसून शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपल्या अधिकारात सुटी दिली.
  •  आरक्षण मिळाले पाहिजे या मराठा समाजाच्या मागणीला भावसार, हलबा युवा समाज, मुस्लीम परिषदेसह अनेक समाजाने पाठिंबा आंदोलनाला पाठिंबा दिला.
टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा