शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

वसुलीचे लक्ष्य पूर्ण करा, अन्यथा वेतन रोखणार

By admin | Updated: March 6, 2016 03:00 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द झाल्यानंतर मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत झाला आहे.

महापालिका कर वसुलीत माघारली : आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना फटकारलेनागपूर : स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द झाल्यानंतर मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत झाला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आजवर झालेली वसुली तब्बल ३० कोटींनी कमी आहे. मार्चच्या शेवटपर्यंत दिलेल्या लक्ष्याच्या जवळपासही पोहोचायचे असेल तर या उरलेल्या २६ दिवसांत वसुलीता गती द्यावी लागणार असून, दररोज सुमारे तीन कोटी रुपयांची वसुली करावी लागणार आहे.मालमत्ता कराच्या वसुलीबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर गंभीर आहेत. कराची वसुली ढेपाळल्याचे लक्षात येताच त्यांनी महालातील नगर भवनात दहाही झोनच्या कर वसुलीचा आढावा घेतला. या आढाव्यात त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कान टोचले. लक्ष्य पूर्ण न करणाऱ्यांचे पगार रोखले जातील, असा इशाराही त्यांनी दिला. यानंतरही गांभीर्याने घेतले गेले नाही व वसुलीत खूपच मागे राहिले तर संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यासही मागे-पुढे पाहिले जाणार नाही, अशा कडक शब्दात त्यांनी ताकीद दिली. बैठकीत महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे नवनियुक्त अध्यक्ष बंडू राऊत, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, कर वसुली व संकलन समितीचे सभापती गिरीश देशमुख, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश सिंगारे, बाल्या बोरकर, अविनाश ठाकरे, मालमत्ता कर विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम आदी उपस्थित होते. दहाही झोनचे सहायक आयुक्त, कर निरीक्षकदेखील उपस्थित होते. आयुक्त हर्डीकर म्हणाले, १ एप्रिल २०१५ पासून कर वसुलीचा नवा फॉर्म्युला लागू झाला आहे. यात भाडेकरू ठेवल्यानंतर लागणाऱ्या करात कपात करण्यात आली. मात्र, निवासी करांमध्ये वाढ झाली. नव्या मालमत्तांवरदेखील कर आकारणी करण्यात आली. असे असतानाही कर वसुलीत महापालिका माघारली आहे. गेल्या वर्षी याच काळात १६५ कोटी रुपयांची वसुली झाली होती. यावर्षी मात्र १३५ कोटींवर गाडी थांबली आहे. आर्थिक वर्ष संपायला २६ दिवस उरले आहेत. या काळात वसुली कशी करणार, त्यासाठी काय नियोजन केले आहे, याबाबत आयुक्तांना, अधिकाऱ्यांना विचारणा केली.(प्रतिनिधी)