शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

विपश्यना मेडिटेशन सेंटर परिसरात सुविधा पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:28 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या संभाव्य नागपूर तसेच कामठी येथे डॅÑगन पॅलेस परिसरातील विपश्यना मेडिटेशन केंद्राच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी....

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : राष्ट्रपतींच्या दौरा कार्यक्रमाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या संभाव्य नागपूर तसेच कामठी येथे डॅÑगन पॅलेस परिसरातील विपश्यना मेडिटेशन केंद्राच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी विविध शासकीय यंत्रणांतर्फे करावयाच्या व्यवस्थेसंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी वरिष्ठ अधिकाºयांच्या बैठकीत आढावा घेतला.कामठी येथील डॅÑगन पॅलेस येथे राष्ट्रपती यांच्या संभाव्य दौरा संदर्भातील व्यवस्था आढावा बैठकीस केंद्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्या माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, अपर पोलीस आयुक्त श्यामराव दिगावकर, पोलीस उपआयुक्त रामसिंग परदेशी, नीलेश भरणे, वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता आर.जी. शेख, सामाजिक न्याय विभागाचे डॉ. सिद्धार्थ गायकवाड, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, उपविभागीय महसूल अधिकारी अविनाश कातडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत नवघरे, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या संभाव्य दौºयानुसार ड्रॅगन पॅलेस परिसरातील मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन करणार असून, त्या अनुषंगाने करावयाच्या व्यवस्थेसंदर्भात आढावा घेताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रपती यांच्या आगमनापासून तर प्रयाणापर्यंत करावयाच्या व्यवस्थेसंदर्भात अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे यांच्या नियोजनानुसार हेलिपॅड, रस्त्याची सुधारणा, कार्यक्रमस्थळी करावयाच्या आवश्यक सुविधा यासंदर्भात आढावा घेऊन विविध विभागाने सोपविलेली कामे तात्काळ पूर्ण करावीत, अशा सूचना विभागप्रमुखांना यावेळी दिल्या. प्रारंभी अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी मेडिटेशन सेंटर तसेच राष्ट्रपती यांच्या संभाव्य दौºयाबाबत यावेळी माहिती दिली. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी राष्ट्रपती यांच्या संभाव्य दौºयानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या व्यवस्थेसंदर्भात यावेळी माहिती देताना रस्ते, वीज तसेच पाण्याच्या संदर्भात विभागप्रमुखांनी अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या. पोलीस विभागातर्फे व्यवस्थेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला.