शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरातील विकास कामे तातडीने पूर्ण करा : पालकमंत्री बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:02 IST

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नागपूर महापालिका क्षेत्रात सुरू असलेली विकास कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे केल्या.नागपूर महापालिकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या जिल्हा नियोजन समितीअंतर्गत महापालिका कामाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देआढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नागपूर महापालिका क्षेत्रात सुरू असलेली विकास कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे केल्या.नागपूर महापालिकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या जिल्हा नियोजन समितीअंतर्गत महापालिका कामाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी आ. मल्लिकार्जुन रेड्डी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यात नावीन्यपूर्ण योजना, कौशल्य विकास योजना, पाणीपुरवठा, दलित वस्ती सुधार योजना यासह विविध योजनांचा समावेश होता. जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेला प्राप्त झालेल्या निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. महापालिका क्षेत्रात एकूण सर्व कामांचा सद्य:स्थितीचा अहवाल येत्या आठ दिवसात सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. यात प्रत्येक ठिकाणी सुरू असलेल्या कामावर अधिकाऱ्यांनी जाऊन निरीक्षण करावे. तसेच कामे पूर्ण किंवा अपूर्ण याबाबतचा स्पष्ट अहवाल तयार करावा. अपूर्ण असलेली कामे किती दिवसात पूर्ण करण्यात येतील, याबाबतची माहिती सादर करावी. प्रत्येक कामाचे छायाचित्र व चलचित्रीकरणासह माहिती द्यावी, अशा विविध सूचना त्यांनी यावेळी केल्या. या बैठकीत अभियंता वासनिक, शिक्षणाधिकारी मिश्रीकोटकर, नगररचनेचे सहायक संचालक गावंडे, हनुमाननगर झोनचे अभियंता बाराहाते, पाणीपुरवठा अभियंता गणवीर, बॅनर्जी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.अखेर कुणासाठी बैठकजिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. परंतु या बैठकीत ना महापौर आल्या ना आमदार आलेत. रामटेकचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी मात्र उपस्थित होते. त्यांचा मनपा क्षेत्रात सुरू असलेल्या कामांशी कुठलाही संबंध नव्हता. तरीही ते आलेत. परंतु शहरातील एकही आमदार बैठकीला आले नाहीत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी अधिकाºयांनाच प्रश्न केला की, ही बैठक कुणासाठी बोलावण्यात आली आहे. आमदार, महापौर, पदाधिकारी कुणीही उपस्थित नहीत तर मग चर्चा कुणासोबत करणार आणि समस्येचे निराकरण कसे होणार. ही बैठक पुन्हा बोलावण्यात यावी, असेही पालकमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाguardian ministerपालक मंत्रीChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे