शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कस्तुरचंद पार्कमधील विकास कामे ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 01:03 IST

शहराच्या हृदयस्थळी असलेल्या हेरिटेज कस्तुरचंद पार्क परिसरात सुरू असलेली विविध विकास कामे येत्या ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात यावीत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी महानगरपालिकेला दिला. तसेच, येत्या दोन आठवड्यात सर्व खड्डे बुजवून मैदान समांतर करण्यात यावे व काही अतिक्रमण वाचले असल्यास तेही हटविण्यात यावे, असे सांगितले.

ठळक मुद्देखड्डे भरून मैदान समांतर करण्यास सांगितले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहराच्या हृदयस्थळी असलेल्या हेरिटेज कस्तुरचंद पार्क परिसरात सुरू असलेली विविध विकास कामे येत्या ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात यावीत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी महानगरपालिकेला दिला. तसेच, येत्या दोन आठवड्यात सर्व खड्डे बुजवून मैदान समांतर करण्यात यावे व काही अतिक्रमण वाचले असल्यास तेही हटविण्यात यावे, असे सांगितले.प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. २७ एप्रिल २०१७ रोजी न्यायालयाने कस्तुरचंद पार्कवरील व आजूबाजूचे अतिक्रमण तात्काळ हटविण्याचा आदेश महानगरपालिकेला दिला होता. या कारवाईसाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते. तसेच, कस्तुरचंद पार्कवर परत अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले होते. असे असताना महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने जबाबदारीला न्याय दिला नाही. त्यांच्या दुर्लक्षामुळे कस्तुरचंद पार्कची दुरवस्था झाली. मैदानावर झाडेझुडपे वाढली. मैदानावरील स्मारकामध्ये अतिक्रमण करण्यात आले. परिणामी, १९ जून रोजी उच्च न्यायालयाने महानगरपालिका व पोलीस प्रशासनाला फटकारले होते. न्यायालय हे कायदे व जनहिताचे संरक्षक असते. ते अशा परिस्थितीकडे मूकदर्शक होऊन बघत राहू शकत नाही, असे परखड निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. त्यानंतर मनपा व पोलिसांनी तातडीने अतिक्रमण हटवले. परंतु, मैदानावरील खड्डे व झाडेझुडपे कायम आहेत. विकास कामांमुळे मैदानाची दुरवस्था झाली आहे. अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी याचिकेचे तर, अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी मनपातर्फे कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयKasturchand Parkकस्तूरचंद पार्क