शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

प्रसुती रजा नाकारल्याबद्दल आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 19:55 IST

तुकाराम मुंढे यांनी माझे प्रसूती हक्क नाकारले. कोविड-१९ चा संसर्ग वाढल्याने नागपूर शहर ‘रेड झोन’मध्ये असताना मी ‘ग्रीन झोन’मध्ये असलेल्या भंडारा येथे माझ्या लहान मुलासह वास्तव्यास होते. माझी प्रसूती रजा नाकारण्यात आली.

ठळक मुद्देप्रसूतीविषयक कायदेशीर हक्क नाकारले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रसूती काळातील महिला कर्मचाऱ्यांना असलेले कायदेशीर हक्क नाकारून अपमानजनक वागणूक व मानसिक छळ करण्यात आल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली असल्याची माहिती स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या महिला सेक्रेटरी यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिली.तुकाराम मुंढे यांनी माझे प्रसूती हक्क नाकारले. कोविड-१९ चा संसर्ग वाढल्याने नागपूर शहर ‘रेड झोन’मध्ये असताना मी ‘ग्रीन झोन’मध्ये असलेल्या भंडारा येथे माझ्या लहान मुलासह वास्तव्यास होते. माझी प्रसूती रजा नाकारण्यात आली. तसेच वर्क फ्रॉम होमची सुविधाही नाकारली. आयुक्तांची भेटीची वेळ घेऊन या संदर्भात चर्चेसाठी मनपा मुख्यालयात पोहोचले. परंतु मला तीन तास कक्षाबाहेर उभे ठेवण्यात आले. त्यानंतर मी त्यांच्या कक्षात गेले असता मला तुमच्याशी काही बोलायचे नाही, असे आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले. एवढेच नव्हे तर मला धमकी दिली. मला नोकरीवरून काढून टाकण्यासाठी कारणे दाखवा नोटीसही पाठवली.

या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला अपमानजनक वागणूक देऊन मानसिक छळ केल्याने महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संबंधित महिला अधिकारी यांनी दिली.याप्रकरण़ी महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना नोटीस बजावली असून आयुक्त तुकाराम मुंढे यांना सात दिवसात स्पष्टीकरण मागितले आहे. स्पष्टीकरणानंतर आयोगाचे समाधान न झाल्यास आयुक्तांवर या प्रकरणात कारवाई होते का याकडे महापालिका वर्तुळासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढे