शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कचरा घोटाळ्याची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 21:25 IST

शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेले कंत्राटदार ट्रकमध्ये माती, दगड व वेस्ट मटेरियल आणून भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये जमा करून महापालिकेची फसवणूक करतात.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेले कंत्राटदार ट्रकमध्ये माती, दगड व वेस्ट मटेरियल आणून भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये जमा करून महापालिकेची फसवणूक करतात. या ट्रक चालकांना रविवारी रंगेहात पकडले. यासंदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराच्या विरोधात पोलिसात तक्रार करणे अपेक्षित होते. परंतु ती केली नसल्याने मुख्यमंत्री, गृहमंत्री व नगरविकास मंत्री यांच्याकडे तक्रार करून, यासंदर्भात गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती आमदार विकास ठाकरे यांनी सोमवारी दिली.ठाकरे यांनी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांच्याशी चर्चा केली. कचºयाच्या ट्रकमध्ये माती व दगड, वेस्ट मटेरियल आणले जात असल्याचे पुरावे दिले. व्हिडिओ शूटिंग दाखविली. आज वाट बघितली परंतु सोमवारी रात्रीपर्यंत दोषी कंत्राटदारांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला नव्हता. मनपा प्रशासन चोराची पाठराखण करत आहे. दुसरीकडे सामान्य नागरिकांनी टॅक्स भरला नाही, अतिक्रमण केले, अनधिकृत बांधकाम केले तर तात्काळ कारवाई केली जाते. मग कंपनीवर महापालिकेचे अधिकारी इतके मेहेरबान कशासाठी, असा सवाल विकास ठाकरे यांनी केला आहे.ट्रक चालकाने भांडेप्लॉट व यशस्वीनगर येथून जेसीबीच्या साह्याने ट्रकमध्ये माती व दगड भरल्याची कबुली दिली आहे. त्याचा जबाब रेकॉर्ड आहे. त्याचे व्हिडिओ शूटिंग आहे. हा प्रकार मागील काही महिन्यांपासून संगनमताने सुरू आहे. दोन्ही कंपन्यांनी मागील आठ महिन्यात कचºयाऐवजी दगड, माती व वेस्ट मटेरियल भांडेवाडी येथे जमा करून कोट्यवधीचा घोटाळा केला आहे.कारवाई न केल्यास आंदोलनमनपा प्रशासनाला कचरा घोटाळ्याचे पुरावे सादर केले आहेत. त्यानंतरही कंत्राटदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जात नसेल तर या विरोधात आंदोलन करू, असा इशारा विकास ठाकरे यांनी दिला आहे.मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना भेटणारकचरा घोटाळ्यासंदर्भात मनपा प्रशासनाने दोषी कंत्राटदारांच्या विरोधात कुठलीही कारवाई न केल्यास यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुराव्यासह तक्रार दाखल करून चौकशीची मागणी करणार आहे. गृहमंत्र्यांना मंगळवारी भेटणार असल्याची माहिती विकास ठाकरे यांनी दिली.

टॅग्स :Vikas Thakreविकास ठाकरेGarbage Disposal Issueकचरा प्रश्न