शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

तक्रारकर्त्या महिलेला धमकी

By admin | Updated: October 30, 2016 02:40 IST

कचरा व सिवरेज लाईन तुंबल्याची तक्रार केल्यानंतर तातडीने दखल घेतली जाते, असा दावा महापालिकेतील पदाधिकारी करतात. परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे.

पोलिसात तक्रार : आरोग्य विभागावर सभापतींचा वचक नाहीनागपूर : कचरा व सिवरेज लाईन तुंबल्याची तक्रार केल्यानंतर तातडीने दखल घेतली जाते, असा दावा महापालिकेतील पदाधिकारी करतात. परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. जरीपटका भागातील अंगुलीमाल नगर येथील रहिवासी असलेल्या एका महिलेने घरासमोलील नाली तुंबल्याची झोन कार्यालयाकडे तक्रार केली म्हणून तिला चक्क जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. महापालिकेत कर्मचारी असलेल्या कमलाबाई हरिश्चंद्र पाटील एकट्याच राहतात. त्यांच्या घरापुढील नाली गेल्या काही महिन्यांपासून तुंबली आहे. यामुळे घाण वास येत असल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी मंगळवारी झोन कार्यालयाकडे तक्रार केली, परंतु याची दखल घेतली नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केली. नगरसेवकांकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेत नसल्याने शनिवारी पुन्हा झोन कार्यालयात तक्रार देण्यासाठी आल्या असता त्यांना सफाई कर्मचाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी या संदर्भात जरीपटका पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महापालिका कर्मचारी असलेल्या महिलेच्या तक्रारीची दखल आरोग्य विभागाकडून घेतली जात नसेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सभापतींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी)आरोग्य समिती कागदावरचशहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या आरोग्य विभागाच्या कारभारावर नियंत्रण असावे, यासाठी आरोग्य समिती आहे. परंतु समितीचे सभापती देवेंद्र मेहर यांच्यासह अधिकाऱ्यांकडे कचरा व नाली तुंबल्याची तक्रार केल्यास त्याची दखल घेतली जात नाही. सभापती निष्क्रिय असल्याची नागरिकांची तक्रार आहे. कमलाबाई पाटील यांनाही असाच अनुभव आला. सभापतीच नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नसल्याने आरोग्य समिती ही कागदावरचीच असल्याची महापालिकेत चर्चा आहे.