शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

धनुषला मिळतोय समाजाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:41 IST

डोळ्याच्या कर्करोगामुळे दोन्ही डोळ्यांनी अधू झालेल्या मुलाला दृष्टी मिळावी त्याला जग पाहता यावे यासाठी समाजाकडे ‘लोकमत’च्या माध्यमातून मदतीचा हात मागणाºया आराधनानगर......

ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताने घोडेले कुटुंबाला बळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डोळ्याच्या कर्करोगामुळे दोन्ही डोळ्यांनी अधू झालेल्या मुलाला दृष्टी मिळावी त्याला जग पाहता यावे यासाठी समाजाकडे ‘लोकमत’च्या माध्यमातून मदतीचा हात मागणाºया आराधनानगर येथील घोडेले कुटुंबाच्या मदतीसाठी समाजमन पुढे सरसावले आहे.बुधवारी लोकमतने ‘अंधारलेल्या दृष्टीला हवी मदतीची ज्योत’ या मथळ्यातील वृत्तात डोळ्याच्या कर्करोगामुळे दोन्ही डोळ्यांनी अधू झालेल्या एक वर्षीय धनुष घोडेले या चिमुकल्याची व्यथा मांडली होती. मुलाच्या उपचारासाठी धनुषचे वडील प्रदीप घोडेले यांनी अलीकडेच हैदराबाद गाठले होते. तेथील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला देत चार लाख रुपयांचा खर्च सांगितला होता. मात्र इतकी मोठी रक्कम कशी जमवायाची हा प्रश्न त्यांच्यासमोर कायम आहे. मात्र ‘लोकमत मदतीचा हात’ या उपक्रमामुळे मुलगी जान्हवी हिच्या शस्त्रक्रियेचा खर्च झाला होता. त्यामुळे धनुषलाही लोकमतच्या माध्यमातून समाजाचा आधार मिळेल, ही अपेक्षा ठेवत प्रदीप घोडेले कुटुंबासह मंगळवारी लोकमत भवन येथे आले होते. बुधवारी धनुषला हव्या असलेल्या मदतीचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर समाजातील विविध घटकातील मान्यवरांनी प्रदीप घोडेले यांच्याशी संपर्क साधला आणि मदतीचा हात पुढे केला. मुख्यमंत्री मित्र सामाजिक कार्यकर्ते डॉ.आशिष अटलोए आणि त्यांच्या सहकाºयांनी लोकमत भवन येथे बुधवारी घोडेले कुटुंबाला प्राथमिक उपचारासाठी सात हजार रुपयांची मदत केली आणि आणखी मदत करण्याचे आश्वासन दिले.बजाजनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कैलाश कुथे याप्रसंगी उपस्थित होते.आपणही करूशकता मदतधनुष प्रदीप घोेडेले यांना मदत करू इच्छिणाºयांनी ‘भारतीय स्टेट बँक’, शाखा खरबी चौक येथील खाते क्रमांक ३७२०२७९०९८२ व आयएफएससी क्रमांक : एसबीआयआयएन ००१८०९६ येथे धनादेश किंवा धनाकर्ष पाठवून मदत करावी. प्रदीप घोडेले यांच्याशी ७४१४९६७५६० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.