शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

जीवनात विकासासाठी संवाद कौशल्य महत्त्वाचे : मान्यवरांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:55 IST

सामाजिक जीवनात सर्वांगीण विकासासाठी संवाद कौशल्य महत्त्वपूर्ण असल्याचा सूर मान्यवरांनी येथे काढला.संवाद कौशल्यावर ‘संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हील लाईन्स येथे बुधवारी करण्यात आले.

ठळक मुद्दे‘संवाद’ विषयावर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामाजिक जीवनात सर्वांगीण विकासासाठी संवाद कौशल्य महत्त्वपूर्ण असल्याचा सूर मान्यवरांनी येथे काढला.संवाद कौशल्यावर ‘संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हील लाईन्स येथे बुधवारी करण्यात आले.उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे (व्हीआयए) अध्यक्ष डॉ. सुरेश राठी, विशेष अतिथी जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठान सोसायटीच्या अध्यक्षा ज्योती बावनकुळे, शेफ विष्णू मनोहर, जवाहर विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष रमेश गिरडे, समन्वयक विजय जथे आणि आयोजक मनीषा बावनकर उपस्थित होते.संवाद कौशल्यावर बोलताना सुरेश राठी म्हणाले, मानवजातीचा विकास मुख्यत्वे मनुष्यामधील कुशल संवादामुळे होतो. संवाद जीवनातील आवश्यक भाग आणि एक सामाजिक कौशल्य आहे. श्वेता शेलगावकर म्हणाल्या, सार्वजनिक जीवनात बोलताना विद्यार्थी आणि व्यावसायिकांमध्ये कुशलता आवश्यक आहे. ऑल इंडिया रेडिओचे उद्घोषक किशन शर्मा यांनी योग्य संवाद आणि भाषेचे महत्त्व सांगितले आणि या क्षेत्रातील अनुभव कथन केले. विष्णू मनोहर यांनी टीव्ही, लाईव्ह अँकरिंग, न्यूज रीडर आणि मुलाखतीचे महत्त्व सांगितले. स्टॅण्डअप कॉमेडी व समालोचन यावर विशेष सत्र घेतले. या सत्राला प्रेक्षकांनी दाद दिली.कार्यक्रमात आकार गु्रप ऑफ इन्स्टिट्युशन्स, हिंगणा, अ‍ॅप्टेक एव्हिएशन अकॅडमी, आदर्श विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, श्रीमती कौशल्यादेवी माहेश्वरी महिला महाविद्यालय, आंबेडकर कॉलेज, संताजी कॉलेज, धनवटे नॅशनल कॉलेज, एलएडी कॉलेज सेमिनरी हिल्स, शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज आणि सेवादल कॉलेजचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.समारोपीय कार्यक्रमात विष्णू मनोहर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. विशेष अतिथी ज्योती बावनकुळे, नीलिमा बावणे, वंदना शर्मा आणि भास्कर रागीट उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक विजय जथे यांनी तर आयोजन मास्क इव्हेंट ऑर्गनायझर व लाईफ स्टाईल स्टोअरच्या संचालिका मनीषा बावनकर यांनी केले. आभार मनीषा बावनकर यांनी मानले.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर