शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ-मराठवाड्यासाठी समिती गठित करणार

By admin | Updated: September 12, 2015 02:55 IST

विदर्भ आणि मराठवाडा विभागातील वीज वितरण, कृषीपंप, विजेचे दर आणि वीज वहनावर होणारा खर्च,

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे : विभागीय आयुक्त अनुपकुमार राहणार अध्यक्ष नागपूर : विदर्भ आणि मराठवाडा विभागातील वीज वितरण, कृषीपंप, विजेचे दर आणि वीज वहनावर होणारा खर्च, तसेच उद्योग उभारणी करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच एक समिती स्थापन करून सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील, असे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ते विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विदर्भ आणि मराठवाड्यातील विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलत होते. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर, विभागीय आयुक्त अनुपकुमार, महावितरणचे संचालक अभिजित देशपांडे, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य मधुकरराव किंमतकर, मुख्य अभियंता एम.डी. झोडे, रेश्मे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. विदर्भ आणि मराठवाड्याला विजेच्या दरात सबसिडी देण्यात येणार आहे. ती कशी व किती प्रमाणात द्यावी, याबाबत एक ‘फॉर्म्युला’ बनविण्यात येईल. त्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असून या समितीमध्ये अमरावती आणि औरंगाबादचे विभागीय आयुक्त तसेच विदर्भ विकास मंडळाचे सदस्य मधुकरराव किंमतकर यांच्यासह वीज वितरण कंपनीतील अधिकारी यांचा समावेश असणार आहे. ही समिती वीज वितरण करतांना येणाऱ्या अडचणी, त्या अडचणींवर मात करून वीज निर्मिती, कंपनी, उद्योजक आणि शेतकरी तथा ग्राहकांना फायदेशीर राहील, यांचा प्रामुख्याने विचार करून लवकरात लवकर अहवाल सादर करेल. त्या अहवालाचे अवलोकन करून शासनाकडून सर्व त्या उपाययोजना करण्यात येतील, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर यांनी सांगितले की, शेजारी राज्यातील वीज दर आणि तेथील उद्योग तथा कंपन्यांचा विचार करून महाराष्ट्र हे देशात वीज निर्मितीमध्ये मॉडेल बनविण्याच्या दृष्टीने शासन काम करत असून त्यासाठी सर्व वीज कंपन्या, उद्योजकांची तितकीच मदत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भात उत्पादित होणाऱ्या एकूण विजेच्या केवळ १४ टक्के तर मराठवाड्यात ९ टक्के वापर होतो. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी पाच वर्षापर्यंत वीज जोडणीसाठी प्रयत्न करीत असतात. त्यामुळे येथील शेती, शेतकरी आणि उद्योगांना चालना मिळत नसल्याचे विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य मधुकरराव किंमतकर यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)