शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोविड उपचारावरील दर ठरविण्यासाठी नागपुरात समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 20:18 IST

अन्य शहरांमध्ये कोविडवरील उपचारांवर खासगी इस्पितळांनी अवाजवी दर आकारल्याने असंतोष निर्माण झाला आहे. नागपुरात तो होऊ नये म्हणून विभागीय आयुक्त डॉ. संजय कुमार यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या उपस्थितीत विदर्भ हॉस्पिटल्स असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन खासगी इस्पितळांमधील दरासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अन्य शहरांमध्ये कोविडवरील उपचारांवर खासगी इस्पितळांनी अवाजवी दर आकारल्याने असंतोष निर्माण झाला आहे. नागपुरात तो होऊ नये म्हणून विभागीय आयुक्त डॉ. संजय कुमार यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या उपस्थितीत विदर्भ हॉस्पिटल्स असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन खासगी इस्पितळांमधील दरासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे, ही बैठक शनिवारी झाली. मात्र, सोमवारी मनपा व जिल्हाधिकारी कार्यालयांनी प्रत्येकी एका अधिकाऱ्याला सोमवारी शहरातील खासगी रुग्णालयात बसवून रुग्णांच्या देयकाची तपासणी सुरू केल्याने गोंधळ उडाला.बैठकीमध्ये अनेक बाबींवर चर्चा झाली. समितीला कोविडवरील उपचारावरील दर ठरविण्यासाठी अभ्यास करण्याच्या सूचनाही केल्या. याशिवाय सर्व रक्त तपासणी केंद्र, खासगी इस्पितळांनी अ‍ॅन्टिजन चाचण्यांना सुरुवात करावी, त्यासाठी आरोग्य उपसंचालकांनी अ‍ॅन्टिजन टेस्ट किटचा स्टॉल आयएमएमध्ये लावून ५०० ते ५२५ शुल्क देऊन चाचणी करावी, अशा सूचनाही विभागीय आयुक्तांनी दिल्या. सौम्य लक्षण असलेल्या अथवा लक्षणे नसलेल्या कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी डॉक्टर्स आणि हॉटेल्सने मिळून पुढाकार घेण्याचेही त्यांनी सुचविले. शासकीय इस्पितळांमधील बेड्स भरल्यानंतरच खासगी इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येईल, असेही विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले. बैठकीला विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक अरबट, सचिव डॉ. आलोक उमरे, समन्वयक डॉ. अनुप मरार, आयएमए अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी व इतरही खासगी हॉस्पिटलचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. परंतु समिती स्थापन होण्यापूर्वीच शासनाचे अधिकारी सोमवारी खासगी हॉस्पिटलमध्ये खुर्ची टाकून रुग्णांचे देयक तपासू लागल्याने हॉस्पिटलनी याला विरोध केला. यामुळे प्रशासन आणि खासगी हॉस्पिटलमधील वाद समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल