शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील मोक्षधाम घाटाच्या वाहन पार्किंगमध्ये व्यावसायिक वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:05 IST

मोक्षधाम घाटाच्या पार्किंगमध्ये व्यावसायिक वाहने लागत असल्याने, अंत्ययात्रेत येणाऱ्यांची वाहने पार्क करण्यासाठी जागाच राहत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहे. घाटावरील मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देघाटावरील कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष : अंत्ययात्रेत येणाऱ्यानागरिकांच्या वाहनांचे पार्किंग अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोक्षधाम घाटाच्या पार्किंगमध्ये व्यावसायिक वाहने लागत असल्याने, अंत्ययात्रेत येणाऱ्यांची वाहने पार्क करण्यासाठी जागाच राहत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहे. घाटावरील मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे.मोक्षधाम घाटाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठ्या संख्येने व्यावसायिक वाहनांचे पार्किंग असते. यात मालवाहू वाहने, ऑटोडीलवाल्यांची वाहनेसुद्धा रस्त्यावर असतात. मोक्षधाम घाटाच्या समोर वाहनांची रांगच लागलेली असते. अंत्ययात्रा घेऊन मोक्षधाम घाटावर येणाऱ्याच्या वाहनांच्या पार्किंगसाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. परंतु या पार्किंगच्या जागेवर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचे पार्किंग करण्यात येते. मोठ्या संख्येने वाहने पार्किंगमध्ये उभी असतात. त्याचबरोबर ऑटोडील वाल्यांचे विक्रीला असलेले वाहन सुद्धा घाटाच्या पार्किंगमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे घाटावर अंत्ययात्रा घेऊन येणाऱ्यांच्या चारचाकी वाहनांसाठी जागाच राहत नाही. मंगळवारी दुपारच्या सुमारास लोकमतच्या टीमने घाटाच्या पार्किंगचे अवलोकन केले. घाटावर एकही अंत्ययात्रा आलेली नव्हती. तरी सुद्धा घाटाच्या पार्किंगमध्ये मोठ्या संख्येने चारचाकी वाहने व अवजड वाहने पार्क केलेली होती. पार्क केलेल्या वाहनांच्या संदर्भात घाटावरील कर्मचाऱ्यांना विचारले असता, ही वाहने बाहेरची असल्याचे सांगण्यात आले.महापालिकेतर्फे घाटाचे संचालन करण्यात येते. घाटावर मनपाचे कार्यालय सुद्धा आहे. सुरक्षा गार्ड सुद्धा तैनात केले आहे. असे असतानाही बाहेरच्या वाहनांचे पार्किंग येथे करण्यात येत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, घाटावरील मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताने वाहनांना पार्किंग करण्याची परवानगी दिली जाते.

टॅग्स :Parkingपार्किंगNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका