शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक ६० रुपये तर घरगुती सिलिंडर पाच रुपयांनी महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:12 IST

गॅस कंपन्यांनी एप्रिल महिन्यात ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये उपयोगात येणाऱ्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ६० रुपये तर घरगुती सिलिंडरच्या किमतीत पाच रुपयांची वाढ झाली आहे.

ठळक मुद्देगॅस कंपन्यांचा ग्राहकांना महागाईचा झटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गॅस कंपन्यांनी एप्रिल महिन्यात ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये उपयोगात येणाऱ्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ६० रुपये तर घरगुती सिलिंडरच्या किमतीत पाच रुपयांची वाढ झाली आहे.मार्च महिन्यात १९ किलो भरतीच्या सिलिंडरची किंमत १३४२ रुपये होती. त्यात वाढ होऊन भाव १४०२ रुपयांवर पोहोचले. त्यात प्रति सिलिंडर ६० रुपयांची वाढ झाल्यामुळे व्यावसायिकांना झटका बसला आहे. नागपुरात दरदिवशी जवळपास एक हजार व्यावसायिक सिलिंडर आणि १० हजारांपेक्षा जास्त घरगुती सिलिंडरची विक्री होते, हे विशेष. घरगुती सिलिंडर पाच रुपयांनी महाग झाले आहे. मार्च महिन्यात १४.२ किलो सिलिंडरचे दर ७३७.५० रुपये होते. दरवाढ होऊन भाव ७४२.५० रुपयांवर पोहोचले आहे. गॅस एजन्सीचे डिलेव्हरी बॉय सिलिंडर घरी पोहोचवून देण्याच्या नावावर २० रुपये अतिरिक्त मागणी करतात. त्यामुळे ग्राहकांना सिलिंडर महागच खरेदी करावे लागते. मार्च महिन्याच्या २४३.०३ रुपयांच्या तुलनेत सबसिडीची जास्त रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा होणार आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरInflationमहागाई