शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
5
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
6
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
7
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
8
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
9
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
10
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
11
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
12
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
13
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
14
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
16
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
17
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
18
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
19
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
20
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

कामठीत डान्स बार

By admin | Updated: July 7, 2017 01:52 IST

खैरी कामठीतील वेलकम बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंटमध्ये विशेष शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी छापा घातला.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : खैरी कामठीतील वेलकम बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंटमध्ये विशेष शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी छापा घातला. यावेळी त्यांना बारमध्ये दारू पिताना ग्राहक सापडले तर समोर आॅर्केस्ट्राच्या धूनवर चार तरुणी थिरकत होत्या. उपायुक्त भरणे यांनी या सर्वांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, उपायुक्तांच्या या कारवाईनंतर तासा-दोन तासातच त्या सर्वांना जुन्या कामठी पोलीस ठाण्यातून मोकळे करण्यात आले. यामुळे ही कारवाई वादग्रस्त ठरली असून, त्याचे परिणाम येत्या काही तासात संबंधित पोलिसांवर होण्याचे संकेत मिळाले आहे. विशेष शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांचा बुधवारी रात्री नाईट राऊंड होता. त्यांना मिळालेल्या गोपनीय सूचनेनुसार, त्यांनी पहाटे २ च्या सुमारास आपल्या सहकाऱ्यांसह वेलकम बार मध्ये छापा घातला. उपायुक्त भरणे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यावेळी तेथे आॅर्केस्ट्रा सुरू होता. चार तरुणी नृत्य करीत होत्या आणि समोर बसलेले ८ ते १० ग्राहक दारूच्या नशेत झिंगत होते. हॉटेलचे कर्मचारी त्यांना सेवा देत होते. दरम्यान, उपायुक्तांनी छापा टाकल्याचे कळताच जुनी कामठीचे पोलीस धावतपळत तेथे पोहचले. उपायुक्तांनी त्यांची खरडपट्टी काढून त्यांना या गैरप्रकाराबाबत जाब विचारला. त्यानंतर त्या तरुणींसह सर्वांनाच ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिसांच्या वाहनात बसवून पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. त्यानंतर मात्र या कारवाईचा नूरच पालटला. ठाणेदार पोलीस ठाण्यात नसल्यामुळे की काय, येथे त्या सर्वांचे बयान घेऊन औपचारिकता पार पाडत सर्वांना मोकळे करण्यात आले. कामठी पोलीस अनभिज्ञ ४विशेष म्हणजे, थेट उपायुक्तांनी कारवाई करूनही जुनी कामठी पोलीस या संबंधाने माहिती देण्यास सकाळपासून टाळाटाळ करीत होते. माहिती कक्षाला त्यांनी रात्री केवळ चलान कारवाईबाबत सांगितले. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले असून, हे प्रकरण पोलिसांच्या अंगलट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.