शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

५१ दिवस कोमात:रामबाबू घरी परतला

By admin | Updated: January 24, 2016 02:35 IST

रामबाबू विदेसीराम महतो हा बँक आॅफ महाराष्ट्रच्या जबलपूर येथील सकरा शाखेत सफाई कर्मचारी. २३ नोव्हेंबर २०१५ रोजी घरी परतताना त्यांचा अपघात झाला...

नागपूर : रामबाबू विदेसीराम महतो हा बँक आॅफ महाराष्ट्रच्या जबलपूर येथील सकरा शाखेत सफाई कर्मचारी. २३ नोव्हेंबर २०१५ रोजी घरी परतताना त्यांचा अपघात झाला आणि डोक्याला जबर मार लागला. त्याला जबलपूरच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. मृत्यूशी संघर्ष करताना त्यांची प्रकृती अत्यवस्थच होत गेली आणि ते कोमात गेले. तब्बल सात लाख या गरीब कुटुंबाने कसेबसे खर्च करताना आयुष्याची पुंजी लावली, पण डॉक्टरांनी हात टेकले. अखेर त्यांची पत्नी मधुबाला यांनी त्यांना नागपुरात सीम्स हॉस्पिटलमध्ये हलविले, पण जवळ पैसा नव्हता आणि नागपुरात कुणीच नव्हते. लोकमतच्या आवाहनाने रामबाबूंच्या उपचारासाठी समाजातील दानदात्यांनी निधी जमा केला आणि आज रामबाबू संपूर्ण बरे होऊन जबलपूरला परतले. करुणेचे आणि संवेदनेचे एक वर्तुळ सकारात्मकतेने पूर्ण झाले. जबलपूरच्या हॉस्पिटलमध्ये भरती असताना त्यांच्यावरच्या उपचारासाठी आठ लाख रुपये खर्च झाले. बँक आॅफ महाराष्ट्रने काढलेल्या आरोग्य विम्याचे तीन लाख आणि पत्नी मधुबाला हिने सारे दागिने विकून उपचारांचा खर्च केला. नागपुरात आल्यावर मधुबाला यांच्याजवळील ७० हजार रुपये दोनच दिवसात संपले. कोमातून बाहेर आल्यावर जागली आशानागपूर : उपचारांसाठी पैसा नाही आणि कुणीच मदतीला नाही, अशा वेळी त्यांच्या डोळ्यात पतीच्या प्राणासाठी, उपचारासाठी पाणी आले. पण अशा प्रतिकूलतेत त्यांच्यासाठी बँक आॅफ महाराष्ट्रच्या एससी, एसटी, ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशनचे महासचिव आनंद रहाटे धावून आले. महतो यांच्या प्रकृतीत उपचारांनी सुधारणा होऊ शकते, ते चांगले होऊ शकतात, अशी शक्यता डॉक्टरांनीही वर्तविली. त्यामुळे महतो यांच्या पत्नीची उमेद जागली. त्यांच्यावर किमान १५ दिवस उपचारांची गरज होती आणि उपचाराचा खर्च ३५ हजार प्रति दिन होता. आनंद रहाटे यांनी बँकेशी संपर्क साधून बँकेकडून १ लाख ७५ हजार रुपयांची मदत मिळवून दिली. एससी, एसटी असोसिएशनच्या सदस्यांकडूनही एक लाख रुपयांची मदत निर्माण केली. पण यातून उपचार होणे शक्य नव्हते. रहाटे यांनी ही व्यथा लोकमतला सांगितली आणि लोकमतने समाजातील दानदात्यांना मदतीची हाक दिली. लोकमतच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो सहृदय नागरिकांनी शक्य तेवढी मदत मधुबाला यांच्या खात्यात जमा केली. यातून ४ लाख ८३ हजार रुपये जमा झाले आणि उपचार होऊ शकले. लोकमतच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो नागरिकांनी जमा केलेल्या निधीतून महतो यांच्यावर उपचार झाला आणि ते उपचारांना प्रतिसाद द्यायला लागले. तब्येतीत सुधारणा होऊ लागली. सिम्सच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जस्मीन भोयर-धकाते यांच्या अथक प्रयत्नालाही यश आले. डॉ. जस्मीन यांनी उपचाराला प्रतिसाद मिळत असल्याने उपचारांची दिशा आखली. ज्या क्षणी मधुबाला यांना नातेवाईकांच्या मदतीची अपेक्षा होती त्यावेळी साऱ्याच नातेवाईकांनी त्यांच्याकडे पाठ फिरविली. पण अशावेळी त्यांच्या पाठीशी भक्कम आधार देत लोकमत उभा राहिला आणि आज त्या प्रयत्नांना यश आले. सिम्स हॉस्पिटलकडून रोजच्या उपचारांसाठी पैसा मागण्यात येत होता. पण मधुबाला यांच्याकडे काहीही शिल्लक उरले नव्हते. याप्रसंगी आनंद रहाटे आणि विकास रानडे यांनी हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी सुरेंद्र पेंढारकर यांना पैशांसाठी काही काळ देण्याची विनंती केली. एकूणच स्थिती पाहून त्यांनीही संवेदनशीलतेचा परिचय देत महतो कुटुंबाला पैसे जमविण्यासाठी वेळ दिला आणि उपचार सुरू ठेवले. लोकमतने बातमीच्या माध्यमातून आवाहन केल्यावर दुसऱ्या दिवसापासून मदतीचा ओघ सुरू झाला. कुणी २० हजार तर कुणी ५१, ५०० रुपये अशी मदत केली. एका पेन्शनर बाईने तिच्या दहा हजार रुपये पेन्शनमधील चार हजार रुपये रहाटे यांना दिले. या निधीमुळेच रामबाबूंवर उपचार करता आले. ते बरे झाले. जबलपूरला परत जाताना मधुबाला आणि रामबाबू लोकमत कार्यालयात आले. त्यांनी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली. लोकमतने सहकार्य केले नसते तर हा क्षण अनुभवता आला नसता, असे सांगताना मधुबाला यांना भरून आले. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना शब्द सापडत नव्हता पण त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पुरेसे बोलके होते. (प्रतिनिधी)हा तर माणुसकीचाच दूतसाऱ्या नातेवाईकांनी पाठ फिरविल्यावर मधुबाला एकट्या पडल्या. हाती पैसा नाही आणि कुणी मदतीला नाही, कुणाचा आधारही नाही आणि पती मृत्यूच्या दारात. त्याच्यावर उपचारही करणे पैशांअभावी अशक्य झाले होते. अशावेळी बँक आॅफ महाराष्ट्रचे धरमपेठ शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक आनंद रहाटे त्यांच्या मदतीला धावले. एसटी, एससी एम्प्लॉईज असोसिएशन मार्फत त्यांनी मदत उभी केली. त्यांनीच मधुबाला यांची व्यथा लोकमतला सांगितली. याशिवाय काहीही रक्ताचे नाते नसताना ते रात्री रामबाबू यांच्याजवळ थांबले आणि मधुबाला यांना आधार दिला. आनंद रहाटे मदतीला धावले नसते तर कदाचित इतकी मदत मिळू शकली नसती. स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी माणसे आज जास्त आहेत पण रहाटे यांच्या रुपाने माणुसकीचा दूतच दिसला. हे अश्रू समाधानाचेमहिन्याभरापूर्वी पतीच्या उपाचारांसाठी मदतीची याचना करणाऱ्या मधुबाला यांच्या डोळ्यात आसवे आणि गळ्यात हुंदका होता. अर्धवट पुसले गेलेले कुंकू आणि अनिश्चितता होती. पण लोकमतच्या सहकार्याने त्यांचे पती रामबाबू पूर्णत: बरे झाले. लोकमत कार्यालयात कृतज्ञता व्यक्त करायला शनिवारी मधुबाला आल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते आणि भांगेत कुंकू भरलेले होते. आपले सौभाग्य परत मिळाल्याचा त्यांचा भाव आयुष्य व्यापणाराच होता. डोळ्यात अश्रू होते पण ते आनंदाचे, कृतज्ञतेचे होते. रामबाबूंनीही आपल्या श्वासांसाठी लोकमतने केलेल्या सहकार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.