शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन तासाच्या आत क्वारंटाईन होण्यासाठी या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 21:19 IST

सतरंजीपुरा येथील ९० टक्के संक्रमित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यानंतरही शनिवारी पुन्हा सतरंजीपुरा आणि आसपासच्या परिसरातील ८५ कुटुंबाला क्वारंटाईन करण्यासाठी प्रशासनाने हालचाली केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सतरंजीपुरा येथील ९० टक्के संक्रमित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यानंतरही शनिवारी पुन्हा सतरंजीपुरा आणि आसपासच्या परिसरातील ८५ कुटुंबाला क्वारंटाईन करण्यासाठी प्रशासनाने हालचाली केल्या. यासाठी महापालिकेचे अधिकारी, पोलीस, आरोग्य अधिकारी तेथे पोहोचले. अर्ध्या डझन बसही सकाळी ११ वाजताच्या सुमारास तेथे दाखल झाल्या. ‘दोन तासाचा वेळ आहे, ज्यांना स्वेच्छेने क्वारंटाईन व्हायचे आहे, त्यांनी कुटुंबातील सदस्यांसह साहित्य घेऊन बसमध्ये बसावे’ असे प्रशासनाने आवाहन केले. मात्र त्यानंतर एकही नागरिक स्वेच्छेने पुढे आला नाही. त्यामुळे प्रशासनाला आल्या पावली परतावे लागले.सतरंजीपुरा येथील नागरिकांनी ‘लोकमत’ला सांगितले की, प्रशासनातर्फे कोणतेही लिखित पत्र वा नोटीस दिलेली नव्हती. केवळ काही तासाच्या आधी येऊन क्वारंटाईन होण्यासाठी सांगणे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. क्वारंटाईन करावयाचे असल्यास जबरदस्तीने उचलून घेऊन जावे, आम्ही स्वत:हून येणार नाही अशी ताठर भूमिका नागरिकांनी घेतली. सतरंजीपुऱ्यातील तेलंगीपुरा आणि आदिवासी वसतिगृहाच्या आसपास रुग्ण आढळून आला नाही आणि संक्रमण पसरण्याचीही काही शक्यता नाही, असे नागरिकांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे, आरोग्य अधिकारी डॉ. मीनाक्षी माने यांच्यासह अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक यावेळी उपस्थित होते. सतरंजीपुरा येथे लाऊडस्पीकरवरून वारंवार आवाहन केले जात होते. मात्र सायंकाळपर्यंत कुणीही क्वारंटाईनसाठी तयार झाले नसल्याची माहिती आहे. नगरसेवक नितीन साठवणे यांनी सांगितले की, ‘प्रशासनातर्फे नागरिकांना स्वेच्छेने क्वारंटाईन होण्याचे आवाहन केले होते. लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वत:ही लोकांना समजावले. मात्र सायंकाळपर्यंत कुणीही तयार झाला नाही.’पाणी, विद्युत पुरवठा बंद करण्याची धमकीसूत्रानुसार, क्वारंटाईन करण्यासाठी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याची तेथील नागरिकांना धमकी दिली. परंतु त्यानंतरही नागरिकांमध्ये काहीही फरक पडला नाही. ‘जे करायचे ते जबरदस्तीने करा, स्वेच्छेने आम्ही क्वारंटाईन होणार नाही. यापूर्वीही अनेक नागरिक क्वारंटाईन झाले. त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे’ असे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर