शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘प्लेसमेंट’बाबत नागपूर विद्यापीठातील कॉलेजेस उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 10:42 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील केवळ १८ टक्के संलग्नित महाविद्यालयांमध्येच ‘प्लेसमेंट सेल’ आहे. अशास्थितीत विद्यार्थ्यांना नेमके मार्गदर्शन कसे मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देकेवळ १८ टक्के ‘प्लेसमेंट सेल’ना मार्गदर्शन ना भविष्याची दिशा

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अलीकडच्या काळात बेरोजगारी ही एक मोठी समस्या बनली असून, पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी दिशाहीन झालेले दिसतात. विद्यार्थ्यांना दिशा दाखविण्याची महाविद्यालयांचीही जबाबदारी आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या ‘प्लेसमेंट’बाबत तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याबाबत महाविद्यालयेच उदासीन आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील केवळ १८ टक्के संलग्नित महाविद्यालयांमध्येच ‘प्लेसमेंट सेल’ आहे. अशास्थितीत विद्यार्थ्यांना नेमके मार्गदर्शन कसे मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नागपूर विद्यापीठात सद्यस्थितीत ५८४ संलग्नित महाविद्यालये आहेत. यापैकी केवळ ११० महाविद्यालयांमध्ये ‘प्लेसमेंट सेल’ आहेत. यातील अनेक महाविद्यालयांमधील ‘सेल’ केवळ नावापुरतेच सुरू आहेत. या ‘प्लेसमेंट सेल’च्या माध्यमातून केवळ ११ हजार ५०० विद्यार्थ्यांना नेमके मार्गदर्शन मिळू शकते. शिवाय ‘प्लेसमेंट’साठी येणाऱ्या कंपन्यांशी लाखो विद्यार्थ्यांपैकी केवळ साडेअकरा हजार विद्यार्थीच जोडले जाऊ शकतात. मागील वर्षी विविध कंपन्यांनी घेतलेल्या ‘कॅम्पस’ मुलाखती तसेच महाविद्यालयांमधील ‘प्लेसमेंट सेल’च्या प्रयत्नातून ५ हजार २६९ विद्यार्थ्यांना महाविद्यालयातूनच थेट रोजगार मिळू शकला. यातही अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचीच संख्या जास्त होती.

विभागात कधी होणार ‘प्लेसमेंट सेल’?नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, या उद्देशाने प्रत्येक पदव्युत्तर विभागात ‘प्लेसमेंट सेल’ची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा प्रशासनाने केली होती. यासंदर्भात सर्व विभागांना सूचनादेखील देण्यात आल्या होत्या व तेथील प्राध्यापकांकडेच याचा अतिरिक्त कारभार देण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र याबाबत काहीच पुढाकार घेण्यात आला नाही. नागपूर विद्यापीठात काही वर्षांअगोदर ‘प्लेसमेंट सेल’ची स्थापना करण्यात आली होती. परंतु याचा फारसा प्रभाव दिसून आला नाही.

महाविद्यालयांकडून पुढाकारच नाहीसाधारणत: अभियांत्रिकी,विज्ञान व व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांचेच ‘कॅम्पस प्लेसमेंट’ होते, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र कौशल्यविकासाच्या काळात पर्यटन, कृषी, विमा, कौशल्याधिष्ठित रोजगारक्षेत्र, ट्रान्सलेशन, वाणिज्य इत्यादी क्षेत्रांमध्ये अनेक संधी आहेत. मात्र या क्षेत्रातील उद्योग किंवा कंपन्यांना महाविद्यालयांपर्यंत आणण्यासाठी पुढाकारच घेतला जात नाही. ‘प्लेसमेंट सेल’च नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ