शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर महाविद्यालयांनी घेतली शंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 12:20 IST

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल कमी लागल्यामुळे शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील जागा रिक्त राहण्याची शंका आहे. दरम्यान ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी केंद्रीय प्रवेश समितीने ठरविलेल्या केंद्रावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देमनमानी पद्धतीने केंद्र ठरविल्याचा आरोप अर्जात गडबड होण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल कमी लागल्यामुळे शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील जागा रिक्त राहण्याची शंका आहे. दरम्यान ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी केंद्रीय प्रवेश समितीने ठरविलेल्या केंद्रावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही महाविद्यालयांना फायदा होण्यासाठी केंद्रात विद्यार्थ्यांच्या अर्जाच्या भाग २ मध्ये गडबड केली जाऊ शकत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. शंका व्यक्त करणाऱ्या कॉलेजच्या व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालकांना भेटण्याची तयारी करीत आहेत.कार्यालयाने काही दिवसांपूर्वी ११ वीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी झोननुसार मुख्य व मार्गदर्शन केंद्र ठरविण्यात आले. विद्यार्थ्यांना संबंधित शाळेतून अप्लीकेशन किट घेण्यास सांगण्यात आले आहे; सोबतच केंद्रात जाऊन आधी अर्ज भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर अर्ज २ विद्यार्थ्यांना भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रश्न उपस्थित करणाºया कॉलेजच्या मते फॉर्म २ भरताना केंद्रात गडबड करण्यात येते. मागील वर्षीही अशीच गडबड झाली होती. फॉर्म २ मध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या इच्छेशिवाय कॉलेजचे कोड देण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळु शकला नाही. यावेळीही असेच होण्याची शक्यता आहे. यावेळी दहावीचा निकाल कमी लागला. त्यामुळे महाविद्यालयातील जागा रिक्त राहणार आहेत. यामुळे काही आॅनलाईन अर्जाच्या केंद्रासोबत साटेलोटे करून विद्यार्थ्यांच्या अर्जात गडबड करू शकत असल्याचे काही कॉलेजने म्हटले आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ११ वीच्या अर्जासाठी केंद्र ठरविताना कोणत्याच कॉलेजकडे विचारणा केली नसल्यामुळे कॉलेजने शंका व्यक्त केली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र