शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

समाजकार्य महाविद्यालयांनी आर्थिक परिवर्तनासाठी पुढाकार घ्यावा :नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 22:45 IST

    लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : निसर्गातील कोणतीच वस्तू टाकाऊ नाही. प्रत्येक वस्तूपासून काहीतरी निर्माण करता येते. उपलब्ध ...

ठळक मुद्दे लोककेंद्री पर्यावरणपूरक पायाभूत विकासावर मार्गदर्शन

 

 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निसर्गातील कोणतीच वस्तू टाकाऊ नाही. प्रत्येक वस्तूपासून काहीतरी निर्माण करता येते. उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावता येते. त्यामुळे समाजकार्य महाविद्यालयांनी सामाजिक, आर्थिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत ग्रामीण भागातील नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स(मास्वे)च्या वतीने वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत लोककेंद्री पर्यावरणपूरक पायाभूत विकास या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर मास्वेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अंबादास मोहिते, अध्यक्ष डॉ. दीपक वलोकर, सचिव डॉ. अनंत बरडे, डॉ. दिलीप बाराहाते, डॉ. विजय शिंगणापूरे, मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जॉन मेनाचेरी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, गडचिरोलीला बायो एव्हीएशन फ्युएल हब म्हणून विकसित करण्यात येत आहे. डेहराडून ते दिल्ली स्पाईस जेट विमानात २५ टक्के जैविक इंधन वापरून यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. गडचिरोलीच्या भागात जट्रोफा, रतनज्योत, करंज यासारख्या जैविक इंधन देणाऱ्या वनस्पतींची उत्पादन वाढविण्यात येत आहे. यामुळे नागरी उड्डयण क्षेत्र आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. माळरानावर या वनस्पतींची लागवड करता येऊ शकते. यात सामाजिक सहभाग महत्त्वाचा आहे. समाजकार्य विद्यालयातील विद्यार्थ्यांना जट्रोफा, बांबू लावण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. नागपुरात जैविक इंधनावर ३५ बसेस चालविण्यात येत आहेत. यात ट्रॅक्टरमध्ये हे इंधन वापरल्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे १५ ते १६ हजाराची बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळच्या सत्रात समाजकार्य शिक्षण आणि त्यापुढील आव्हाने या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या विषयावर बोलताना जागतिक बँकेचे सल्लागार श्रीकांत बाराहाते यांनी समाजकार्य पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी नागरिक, प्रशासनात दुवा म्हणून कार्य करण्याचे आवाहन केले. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे माजी प्रोफेसर डॉ. मुरली देसाई यांनी समाजकार्य महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमाचा दर्जा वाढविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. नेहरू युवा केंद्र अमरावतीच्या जिल्हा समन्वयक ज्योती मोहिते यांनी समाजकार्य महाविद्यालयात ग्रामीण विकासाचे तंत्र विद्यार्थ्यांना शिकविण्याची गरज असल्याचे सांगितले. संचालन डॉ. जॉन मेनाचेरी यांनी केले. आभार डॉ. शिवपुत्र कुंभार यांनी मानले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीsocial workerसमाजसेवक