शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

उपराजधानी गारठली; पारा घसरला ५.३ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 10:36 IST

रविवारी थंडीच्या बाबतीत नागपूर विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर राहिले. ५.१ अंश सेल्सिअसने चंद्रपूर पहिल्या क्रमांकावर राहिले.

ठळक मुद्देकडाक्याची थंडी कायम दिवसाचे तापमानही घसरले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर भीषण थंडीत सापडले आहे. सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमान सरासरीपेक्षा ७ अंश सेल्सिअसने खाली घसरले असून, ५.३ अंशावर पोहोचले आहे. गेल्या २४ तासात ०.२ अंशाने पारा वर चढला असला तरी, थंडीपासून दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे नागपूर सध्या अतिथंडीच्या विळख्यात सापडला आहे. डिसेंबर महिन्यातील उर्वरित दिवसातही यातून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. रविवारी थंडीच्या बाबतीत नागपूर विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर राहिले. ५.१ अंश सेल्सिअसने चंद्रपूर पहिल्या क्रमांकावर राहिले.हवामान विभागानुसार, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा ४ ते ८ अंश सेल्सिअसने खाली राहिले. त्यामुळे विदर्भात अतिथंडीची लाट पसरली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे दिवसाचे तापमानही खाली घसरले आहे. रविवारी नागपूरचे कमाल तापमान सरासरीपेक्षा ४ अंशाने कमी असून, २४.१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. गेल्या २४ तासात कमाल तापमान ०.८ अंशाने घसरले. दिवस आणि रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा खूप खाली आल्यामुळे कडाक्याची थंडी पसरली आहे. थंडीमुळे रविवारी लोक स्वेटर ऊनी कपडे दिवसभर घालून होते. डॉक्टरांनी लहान मुलं, वृद्ध, महिलांना थंडीपासून स्वत:चे संरक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. अस्थमा, हार्ट, रक्तदाबाने पीडित व्यक्तींना थंडीपासून वाचण्यासाठी विशेष काळजी घ्यावी. गरम कपड्यांच्या मदतीने शरीरातील तापमान सामान्य ठेवण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

डिसेंबरचे ते दोन दिवसथंडीच्या आकड्यांवर नजर टाकली तर डिसेंबर महिन्यातील दोन दिवस सर्वात संवेदनशील आहेत. ते म्हणजे २८ व २९ डिसेंबर. आतापर्यंत यावर्षी २८ डिसेंबर रोजी पारा हा ५.१ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. तो या मोसमातील सर्वात थंड दिवस ठरला. २९ डिसेंबर रोजी पारा ५.३ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला. इतकेच नव्हे तर किमान तापमानातील आकड्यांवर नजर टाकली तर २९ डिसेंबर २०१८ रोजी (३.५ अंश सेल्सिअस) आतापर्यंतचा सर्वाधिक थंड दिवस नोंदवण्यात आला आहे. २९ डिसेंबर २०१४ रोजी ५ अंश सेल्सिअस तापमान होते. २९ डिसेंबर १९६८ रोजी ५.५ अंश तापमान नोंदवण्यात आले. तर कालच २८ डिसेंबर २०१९ रोजी तापमान ५.१ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. २८ डिसेंबर १९८३ व २८ डिसेंबर २०१८ रोजी ५.७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले.

टॅग्स :weatherहवामान