नागपूर - राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Session 2025) ८ डिसेंबर सोमवारपासून सुरुवात होणार आहे. जमीन घोटाळा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड प्रकरण आणि वाढलेले महिला अत्याचार यासह अनेक विषयांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र खडाजंगी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूरचं राजकीयतापमान चांगलंच तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, असं असलं तरी उत्तरेकडून वाहणाऱ्या अति थंड वाऱ्यांमुळे नागपूरचे वातावरण आणखी गराठणार असेच संकेत मिळत आहेत. नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या आमदारांसह मंत्री आणि नेत्यांना आपली तब्येत ही सांभाळावी लागणार आहे.
गेल्या काही दिवसापासून नागपूरसह विदर्भात थंडीची लाट आलेली आहे. सातत्याने तापमान १० ते १२ डिग्रीपर्यंत नोंदवले जात आहे. ६ डिसेंबरला तापमानात घट नोंदवण्यात आलेली आहे. शनिवारी सकाळी नागपूरचं तापमान ८.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून पुढील आठवड्यात तापमानात आणखी २ डिग्रीपर्यंत घट (कमी) होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर केंद्राकडून वर्तवलेली आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उबदार चर्चा करण्यासाठी येणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांना नागपुरात 'हिल स्टेशनचा' फील अनुभवता येणार हे मात्र, नक्की
महाराष्ट्राचे 'विंटर कॅपिटल'
उपराजधानी असलेले नागपूर शहर केवळ संत्री आणि सावजी मटनासाठीच प्रसिद्ध नाही तर हे शहर राज्याचे 'विंटर कॅपिटल' म्हणून ओळखले जाते. प्रत्येक वर्षीचे डिसेंबर महिन्यात नागपूरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरवले जाते. ठराविक काळासाठी राज्य सरकार हे नागपुरात स्थलांतरित होते आणि ही परंपरा १९६० पासून अविरतपणे सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात येणाऱ्या नेत्यांना "वैदर्भीय पाहुणचारा'ची अक्षरशः भुरळच पडलेले असते. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी नेत्यांना, मंत्र्यांना आणि सर्वपक्षीय आमदारांना नागपूरचे हिवाळी अधिवेशनाची विशेष ओढ लागली असते.
Web Summary : Nagpur's winter session starts December 8th. Expect heated debates amidst cold weather. Temperature may drop to 8.6 degrees Celsius. MLAs and ministers to experience a 'hill station' feel.
Web Summary : नागपुर का शीतकालीन सत्र 8 दिसंबर से शुरू। ठंडे मौसम के बीच गरमागरम बहस की उम्मीद। तापमान 8.6 डिग्री सेल्सियस तक गिर सकता है। विधायकों और मंत्रियों को 'हिल स्टेशन' का अनुभव होगा।