शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

जीव धोक्यात घालून खाणीत राबतात कोळसा कामगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 23:53 IST

कोरोनाचे विषाणू वेगाने वाढत असल्याने देशभरात चिंतेचे वातावरण दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कोळसा खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या हितासाठी कामगार संघटनाही पुढे आली आहे. राष्ट्रीय खाण मजदूर फेडरेशन (इंटक) ने या कामगारांचा ५० लाख रुपयांचा विमा उतरविण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्दे५० लाखांचा विमा उतरवा : फेडरेशनची मागणी, सीएसआर-डिझास्टर मॅनेजमेंटचा फंड वापरण्याचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे विषाणू वेगाने वाढत असल्याने देशभरात चिंतेचे वातावरण दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कोळसा खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या हितासाठी कामगार संघटनाही पुढे आली आहे. राष्ट्रीय खाण मजदूर फेडरेशन (इंटक) ने या कामगारांचा ५० लाख रुपयांचा विमा उतरविण्याची मागणी केली आहे.फेडरेशनचे महासचिव माजी आमदार एस. क्यू. जमा यांनी या संदर्भात कोल इंडिया लिमिटेडच्या चेअरमनला पत्र लिहिले असून त्यात ही मागणी केली आहे. त्यांच्या मते, वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील ५५ कोळसा खाणींमध्ये सुुमारे ५५ हजार कामगार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या दिवसातही वीज उत्पादन सुरूच असल्याने कोळशाचा पुरवठाही नियमित ठेवणे आवश्यक आहे. यासाठी खाणींमधील कामगार जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र व राज्य सरकारांनी दिलेल्या निर्देशांचे तसेच खाण कायद्याचे पालन केले जात आहे. तरीही कामगारांना संक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेता डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कमगार आदींप्रमाणे प्रत्येक कामगाराचा ५० लाख रुपयांचा विमा काढण्याची मागणी फेडरेशनने कोल इंडियाकडे केली आहे. कोरोना संकटाच्या काळात आवश्यक वीजनिर्मिती अबाधित ठेवणे आवश्यक आहे, त्यामुळे खाणी बंद करण्याची फेडरेशनची जराही भूमिका नाही, असेही स्पष्ट केले आहे.खाणी बंद करण्याची मागणी अनुचितकोरोनाचा प्रकोप वाढत असताना अन्य कामगार संघटनांकडून खाणी बंद करण्याची मागणी होत आहे. मात्र या काळात ही मागणी अनुचित असल्याचे एस.क्यू. जमा यांनी म्हटले आहे. राष्ट्रहित लक्षात घेता कोळसा खाणी बंद करणे अयोग्य आहे. कामगारांच्या आरोग्यासंदर्भात प्रशासन योग्य ती पावले उचलणार असल्याची आपली माहिती आहे.एक दिवसाचे वेतन कापावेकोळसा कामगारांच्या एका दिवसाच्या वेतनासह तेवढीच रक्कम सीएसआर फंड आणि डिझास्टर मॅनेजमेंट फंडातून कापली जावी. ती एकत्रित करून अर्धी रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये टाकली जावी. उर्वरित अधिक रक्कम कोळसा खाणी असलेल्या राज्यांच्या शासकीय तिजोरीत जमा केली जावी. यातून गरजूंपर्यंत लाभ पोहचविता येईल, असा पर्यायही जमा यांनी सुचविला आहे.

टॅग्स :Western Coal Fields Limited Nagpurवेस्टन कोल फिल्डस् लिमिटेड नागपूरLabourकामगारcorona virusकोरोना वायरस बातम्या