शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा-वणी-माढळी रोडवरील कोळसा वाहतूक ठरेल जीवघेणी

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 12, 2024 18:51 IST

नागरिकांची हायकोर्टात याचिका : मनाई आदेश देण्याची मागणी

राकेश घानोडे, नागपूर : वरोरा-वणी-सोईट-माढळी रोडचा कोळसा वाहतुकीसाठी उपयोग केला जाणार असल्यामुळे सात नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या रोडवर शाळा व नागरी वस्त्या असल्यामुळे ही कोळसा वाहतूक जीवघेणी ठरेल, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी हा धोका लक्षात घेता या रोडवर कोळसा वाहतुकीला मनाई करण्याचा आदेश देण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.

याचिकाकर्त्यांमध्ये मनोज सूर्यवंशी, कुशल थेरे, जयश्री हजारे, तहसीलदार यादव, उज्ज्वला बांडेबुचे, प्रीती शास्त्रकार व नलिनी भुसारी यांचा समावेश आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने १ जानेवारी २०२१ रोजी वेकोलिला भद्रावती तालुक्यातल्या माजरी क्षेत्रातील येकोना खाणीमधून कोळसा काढण्याची परवानगी दिली आहे. या खाणीतील कोळशाची वाहतूक करण्यासाठी वेकोलि वरोरा-वणी-सोईट-माढळी रोड बांधत आहे. त्याकरिता, चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी ३ मार्च २०२३ रोजी वेकोलिला जमीन हस्तांतरित केली आहे. हा रोड मार्डा येथील संस्कार भारती शाळेला लागून जाणार आहे. ही शाळा २००६ पासून कार्यरत आहे. तसेच, या रोडवर अनेक नागरी वस्त्याही आहेत. परिणामी, या रोडवरून कोळसा वाहतूक करणे जनहिताचे होणार नाही, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. 

केंद्र सरकारला मागितले उत्तरया प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे सचिव, राज्याच्या पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर जिल्हाधिकारी व वेकोलिचे महाव्यवस्थापक (पर्यावरण) यांना नोटीस बजावून येत्या २८ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. महेश धात्रक यांनी बाजू मांडली.

टॅग्स :nagpurनागपूर