शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

कोळसा खाणीतील ब्लास्टच्या भयाखाली जगते आहे नागपूर जिल्ह्यातले भानेगाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:00 PM

खापरखेडा परिसरातील भानेगाव खुली कोळसा खाण सुरू झाली तरी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे.

ठळक मुद्देनागरिकांनी केले ठिय्या आंदोलनपुनर्वसन होणार केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खापरखेडा परिसरातील भानेगाव खुली कोळसा खाण सुरू झाली तरी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. भानेगाव जुन्या वस्तीत जवळपास ८०० नागरिक वास्तव्यास आहेत, मात्र या खाणीतून कोळसा काढण्यासाठी रात्रीबेरात्री दररोज होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे येथील नागरिक भयभीत झाले आहे. जीव मुठीत घेऊनच नागरिकांना जीवन जगावे लागत आहे. परंतु या गंभीर समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शेकडो नागरिकांनी शनिवारी ठिय्या आंदोलन पुकारले होते.विशेषत: कोळसा खाणीतून निघणारी माती गावालगत डम्पिंग करीत असल्याने नागरिकांना नव्याने प्रदूषणाला तोंड द्यावे लागत आहे.या संदर्भात वारंवार निवेदने दिली. मात्र संबंधित प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. अखेर शनिवारी (दि.१०) भानेगावचे सरपंच रवींद्र चिखले यांच्या नेतृत्वात सुमारे २०० नागरिकांनी डम्पिंग यार्डाजवळ ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर दोन तासांनी हे गावकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.भानेगाव ओपन कास्ट कोळसा खाणीसाठी दुसऱ्या टप्प्यात कोल बेरिंग अ‍ॅक्ट सेक्शन ९ नुसार परिसरातील जवळपास १३१.९० हेक्टर शेती वेकोलि प्रशासनाने संपादित केली. यातील बहुतांश शेतकऱ्यांशी वेकोलि प्रशासनाने करारनामे केले असून त्यांना मोबदला व नोकऱ्या दिल्या आहेत. मात्र भानेगाव जुन्या वस्तीतील पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. त्यामुळे गावाचे पुनर्वसन कधी, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. भानेगाव ग्रामपंचायतीने वेकोलि प्रशासनाला जुन्या वस्तीतील ३२८ घरांची यादी दिली असून १० टक्के वाढीव आबादी दिली आहे. मात्र अजूनही येथील घरांचे मूल्यांकन करण्यात आले नाही.या खुल्या खाणीत लाखो टन कोळशाच्या उत्पादनाला सुरुवात झाली. त्यामुळे वेकोलि प्रशासनाची चांदी आहे. परंतु प्रकल्पग्रस्त नागरिक रामभरोसे आहे. सदर कोळसा खाणीत होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे नागरिकांच्या घरांना भेगा गेल्या आहेत. त्यामुळे जुनी वस्ती गावातील नागरिकांचे पुनर्वसन करणे गरजेचे झाले. गावालगत कोळसा खाणीतून निघणारी माती अन्य ठिकाणी डम्पिंग करण्यात यावी तसेच पुनर्वसन लवकर करण्यात यावे, या प्रमुख मागण्या गावकऱ्यांनी आंदोलनात रेटून धरल्या.खापरखेडा पोलिसांनी मध्यस्थाची भूमिका वठविली. आंदोलनात सरपंच रवींद्र चिखले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विजय वासनिक, विकास बारई, सतीश ढोके, नंदू डोंगरे, भारती नागरकर, सतीश शिंदूरकर, अरविंद चिकणकर, शिवहरी आसुटकर, विनोद नागरकर, कैलास शिंगणे, छत्रपाल शिंदूरकर, मीना युवनाते, शशिकला तांडेकर, संजय गोटे, सचिन नागरकर, वसंता शिंदूरकर, कैलास बर्वे, सुनील तराळे आदींसह मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक सहभागी झाले होते.

टॅग्स :Blastस्फोट