शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कोराडीला पोहोचले कोळसा माफियांचे टोळीयुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 22:36 IST

ग्रामीण पोलिसांच्या भागात सक्रिय वाळू आणि कोल माफियांमध्ये सुरू असलेल्या टोळीयुद्धात चंद्रपूरचा कुख्यात आरोपी शेख समीरने माऊझरच्या धाकावर एका युवकाला मारहाण केली. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण पोलिसांच्या भागात सक्रिय वाळू आणि कोल माफियांमध्ये सुरू असलेल्या टोळीयुद्धात चंद्रपूरचा कुख्यात आरोपी शेख समीरने माऊझरच्या धाकावर एका युवकाला मारहाण केली. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. पोलिसांनी शेख समीर आणि त्याचा साथीदार ईश्वर ऊर्फ डायमंड मानकरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.शेख समीर चंद्रपूरमधील वाळू आणि कोळसा माफिया आहे. त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दंगा यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचे साम्राज्य ग्रामीण पोलिसांच्या सीमेत पसरले आहे. त्याचा खापरखेड्यातील कुख्यात आरोपी इद्रिससोबत वाद सुरू आहे. तीन महिन्यांपूर्वी इद्रिस टोळीने समीरच्या कारला आग लावली. त्यानंतर दोघेही एकमेकांचा जीव घेण्यासाठी उतावीळ झाले आहेत. अल्तमश ऊर्फ लल्ला खान (३०) रा. स्मृती नगर आणि त्याचा साथीदार संदीप घुरोले हे त्याच्याबद्दल इद्रिसला माहिती देतात, असा समीरला संशय होता. त्यांच्या सांगण्यावरून इद्रिसने कार जाळल्याची समीरला शंका आली. त्याचा सूड घेण्यासाठी समीरने बुधवारी रात्री फोन करून लल्ला यास कोराडीला बोलाविले. तुझा मित्र संदीप माझ्याबद्दल इद्रिसला माहिती देत असल्याचे सांगून त्यास बोलाविण्यास सांगितले. संदीपला फोन लावताच समीरने लल्लाचा फोन हिसकावून घेतला. त्याने संदीपला जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचे बोलणे ऐकून संदीपने फोन बंद केला. त्यामुळे समीरला राग आला. त्याने माऊझर दाखवून लल्लाला कारमध्ये बसविले. तुझ्यामुळे माझी ४.५० लाखाची कार जळाल्याचे सांगून पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. मारहाण केल्यानंतर समीरने माऊझर ईश्वर ऊर्फ डायमंडला सोपविली. लल्लाने याबाबत कोराडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मारहाण, धमकावणे, हप्तावसुलीचा गुन्हा दाखल केला. समीर अनेक दिवसांपासून कोराडी परिसरात सक्रिय आहे. यापूर्वी त्याने कोराडीतील एका महिलेची छेड काढली होती. सूत्रांनुसार खापरखेड्यातील अनेक आरोपींनी कोराडी परिसरात बस्तान मांडले आहे. ते वाळूची तस्करी करतात. पोलिसांना माहीत असूनही कारवाई न झाल्यामुळे त्यांचे मनोबल उंचावले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmafiaमाफिया