शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

कोळसा आयातीत घोटाळा

By admin | Updated: March 12, 2015 02:47 IST

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली कार्य करणाऱ्या महसूल गुप्तचर संचालनालयाने देशातला सुमारे २९ हजार कोटी रुपयांचा कोळसा आयात घोटाळा शोधून काढला आहे,

नागपूर : केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली कार्य करणाऱ्या महसूल गुप्तचर संचालनालयाने देशातला सुमारे २९ हजार कोटी रुपयांचा कोळसा आयात घोटाळा शोधून काढला आहे, ही बाब संबंधित याचिकाकर्त्याने बुधवारी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून देत महाजनकोकडून करण्यात येत असलेल्या कोळसा आयातीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा दावा अधिक बळकट केला. अनिल वडपल्लीवार असे याचिकाकर्त्याचे नाव असून त्यांनी प्रतिज्ञापत्रावर ही माहिती सादर केली. महसूल गुप्तचर संचालनालयाने ८० मालवाहू जहाज कंपन्या आणि नवी दिल्ली, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिशा इत्यादी राज्यातील प्रयोगशाळांमध्ये धाडी टाकून हा घोटाळा शोधून काढला आहे. कोल इंडिया व सहायक कोळसा कंपन्यांकडून दर्जाहीन कोळसा दिला जात असल्याचे कारण सांगून महाजनको इंडोनेशियातून चढ्या भावाने कोळसा आयात करीत आहे. देशातील दर्जाहीन कोळशामुळे वीजनिर्मिती प्रकल्पांवर वाईट परिणाम होत असल्याचे महाजनकोचे म्हणणे आहे. परंतु, आयात करण्यात येणारा कोळशाला जेवढी किंमत दिली जाते त्यानुसार गुणवत्तापूर्ण असतो काय याबाबत संशय असल्याचे याचिकाकर्त्याने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. कोल इंडिया व सहायक कोळसा कंपन्यांकडून मागणीपेक्षा कमी व दर्जाहीन कोळसा पुरविण्यात आल्यामुळे महाजनकोने भारतीय स्पर्धा आयोगासमक्ष तक्रार दाखल केली होती. यावरून आयोगाने डिसेंबर-२०१३ मध्ये कोल इंडियाला १७७३ कोटी रुपये दंड ठोठावला होता. परंतु, महाजनकोने ही तक्रार संशयास्पदरीत्या मागे घेतली आहे. कोल इंडिया व सहायक कोळसा कंपन्या प्रशोगशाळेमध्ये कोळशाची गुणवत्ता तपासतात. यानंतरही महाजनकोला खराब कोळसा मिळतो. यावरून कोळसा तपासणी प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडते असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता न्यायालयाने महाजनकोला याचिकाकर्त्याच्या प्रतिज्ञापत्रावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. महाजनकोने २०१२-१३ मध्ये २.४७९ तर, २०१३-१४ मध्ये २.५४६ मिलियन मॅट्रिक टन कोळसा आयात केला आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)