नेत्यांचे आवाहन : गोपालनगरात पदयात्रानागपूर : गोपालनगर, सुभाषनगर, सोनेगाव, जयताळा हा भाग नेहमीच काँग्रेसच्या विचारांसोबत राहिलेला आहे. काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक याच भागातून विजयी झालेले आहेत. त्यामुळे या भागाचा विकासही झपाट्याने झाला आहे. यापुढेही सर्वांच्या मदतीने नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य अहोरात्र चालू राहील, असा विश्वास दक्षिण-पश्चिम मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी व्यक्त केला. गोपालनगर परिसरात त्यांनी पदयात्रा काढून मतदारांशी थेट संपर्क साधला. पदयात्रेची सुरु वात माटे चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाली. पदयात्रेच्या माध्यमातून गोपालनगर, पडोळे लेआऊट, नाईक लेआऊट, श्रीनगर व परसोडी परिसरातील सर्व वस्त्यांमधुन भ्रमण केले. प्रत्येक वस्तीमध्ये नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी प्रत्येक घरात जाऊन ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. नागरिकांनी परिसरातील समस्या व अडचणी त्यांच्या पुढे मांडल्या. ज्येष्ठ नागरिक, महिला व युवकांचे प्रश्न त्यांनी ऐकून घेतले. पदयात्रेदरम्यान परसोडी येथील बौध्द विहारास भेट देऊन तथागत गौतमबुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस नमन केले. त्यांच्यासोबत थूल गुरु जी, नगरसेवक प्रसन्न बोरकर, नगरसेविका प्रेरणा कापसे , उज्वला बनकर, चौरे काका, मामा गावंडे, काळे काका, भोगे, वसंतरावजी बनकर, अंबर्ते काका, बेलसरे गुरु जी, खेरकर, कडवे काका, नगराळे , बावणे, कनोजिया, महल्ले, डाखोळे, भुसारी, खवसे काका, प्रशांत कापसे, रॉबर्ट वंजारी, पंकज निघोट, संदेश थूल, चिंटु पारधी, मनोज शाहू, प्रसन्न जिचकार, विलास उकीनकर, नीलेश काळे, मंगेश कामोने, नीलेश बोपचे, शैलेश कोरडे, लक्ष्मीकांत बिसनेवार, चंदू बावणे, वीरेंद्र रंगारी, राजेश गेडाम, छोटू यादव, अजय नासरे, आशुतोश पडोळे, दीपक मारवाडे, योगेश आंबर्ते, विशाल वाघमारे आदी सहभागी होते. (प्रतिनिधी)
विकासासाठी काँग्रेसला साथ द्या
By admin | Updated: October 10, 2014 00:56 IST