शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लगेच जाहीर करणार :  बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 20:19 IST

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लगेच जाहीर करणार असल्याची माहिती जलसंपदा, लाभक्षेत्र तथा शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

ठळक मुद्देदोन लाखांवर कर्ज असणाऱ्यांसाठी दुसरा टप्पा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लगेच जाहीर करणार असल्याची माहिती जलसंपदा, लाभक्षेत्र तथा शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित विदर्भ छात्र संसद या उपक्रमासाठी आले असता पत्रकारांनी त्यांना गाठले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी दोन टप्प्यात कर्जमाफी जाहीर केली होती. त्यातील पहिला टप्पा दोन लाखांच्या आत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी होता. वीस ते पंचवीस हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. दोन लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा हा दुसरा टप्पा राहणार आहे. कर्जमाफी देताना गोंधळ होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. यापूर्वी तीन योजनांचे एकत्रीकरण करून कर्जमाफी देण्यात आली होती. त्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या होत्या. अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मात्र हे सुटसुटीत होईल, असा प्रयत्न असेल.कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात बसणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या बँकेचे पासबुक आणि आधार कार्ड ग्रामपंचायतच्या माध्यमातून बँकेत जमा करण्यासंदर्भात आपण अकोला जिल्ह्यात पालकमंत्री या नात्याने सूचना दिल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शालेय विद्यार्थ्यांना समाजाच्या आणि रुग्णांच्या वेदना कळाव्या यासाठी विद्यार्थ्यांची रुग्णालयांना सहामाही व्हिजिट ठेवण्यासंदर्भात परिपत्रक काढण्याचा सरकार विचार करीत आहे. सहलीच्या धर्तीवर ही व्हिजिट असेल. त्यातून रुग्णसेवेची भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण व्हावी, हा हेतू आहे.अकोल्यातील हत्येची घटना सर्वांसाठीच दुर्दैवी आहे. तपासासाठी चार पथके तयार करण्यात आली असून आयजी, एसपी यांच्या नेतृत्वात ही पथके काम करीत आहेत. चार-पाच दिवसात धागे गवसतील. सुपारी देण्याचा हा प्रकार आहे. या घटनेत गावठी बंदुका वापरण्यात आल्या होत्या. त्या येतात कशा हे सर्वांसाठी प्रश्नचिन्ह आहे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूFarmerशेतकरी