शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसाठी भाजपाकडून ‘क्लस्टर’ प्रणाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 10:48 IST

लोकसभेच्या सर्वच जागांवर भाजपाचे संघटन मजबूत व्हावे व नियोजनबद्ध तयारी करता यावी यासाठी पक्षातर्फे प्रत्येकी तीन ते चार लोकसभांचे ‘क्लस्टर्स’ तयार करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देतीन ते चार लोकसभांचा एकत्र आढावा तयारीच्या २३ मुद्यांची होतेय चाचपणी

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे मतदान आटोपले असताना भाजपातर्फे महाराष्ट्रात मात्र लोकसभा निवडणुकांच्या तयारीवर भर देण्यात येत आहे. लोकसभेच्या सर्वच जागांवर भाजपाचे संघटन मजबूत व्हावे व नियोजनबद्ध तयारी करता यावी यासाठी पक्षातर्फे प्रत्येकी तीन ते चार लोकसभांचे ‘क्लस्टर्स’ तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक ‘क्लस्टर्स’चा टप्प्याटप्प्याने आढावा घेण्यात येत असून यात केंद्रीय नेतृत्वाने सुचविलेल्या २३ मुद्द्यांच्या तयारीची चाचपणी करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.शिवसेनेशी युतीसंदर्भात भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडे सर्व लोकसभा क्षेत्रात पक्षाला बळकटी मिळावी व युती न झाल्यास पक्षाची पूर्ण तयारी असली पाहिजे, यासाठी ‘क्लस्टर्स’ प्रणाली राबविण्यात येत आहे. प्रत्येक लोकसभा क्षेत्राच्या तयारीचा वेगवेगळा आढावा घेणे हे वेळखावू काम ठरणार आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असा विविध क्षेत्रनिहाय आढावा घेतला तर सूक्ष्म पातळीवर आढावा घेणे शक्य होत नाही. त्यामुळेच तीन ते चार लोकसभा क्षेत्र मिळून एक ‘क्लस्टर्स’ तयार करण्यात आले आहे. यात त्या ‘क्लस्टर्स’ अंतर्गत येणाऱ्या जागांवर पक्षाच्या ‘बूथप्रमुख’, ‘पेजप्रमुख’, ‘शक्तीकेंद्र’ या योजनांचा आढावा घेण्यात येत आहे. सोबतच विविध विभागांसह एकूण २३ मुद्द्यांवर नेमकी तयारी कशा पद्धतीने सुरू आहे, याचा सखोल आढावा घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे केंद्रीय पातळीवरुनच हे २३ मुद्दे सांगण्यात आले आहेत. यात ‘सोशल मीडिया’, महिला मोर्चा, ‘लीगल सेल’ यासारख्या विविध बाबींचा समावेश आहे.

राज्य प्रभारी करत आहेत दौराकेंद्रीय पातळीवरील सूचनांनुसार राज्य प्रभारी खा.सरोज पांडे या राज्यात ‘क्लस्टर’ निहाय आढावा घेत आहेत. दोन दिवसांअगोदर पुण्यात त्यांनी बैठक घेतली. त्यानंतर शुक्रवारी नागपुरात बैठक झाली. विविध पातळ्यांवर पक्षाची नेमकी किती तयारी झाली आहे, कुठल्या ठिकाणी पक्षाला आणखी मजबुतीची आवश्यकता आहे तसेच विविध मतदारसंघात कच्चे दुवे कोणते इत्यादींची त्या चाचपणी करत आहेत. याचा सविस्तर अहवाल तयार होणार असून त्याआधारे नवीन वर्षात पुढील दिशा ठरणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात सरोज पांडे यांना विचारणा केली असता त्यांनी संघटनेचा आढावा घेण्यासाठीच बैठका होत असल्याचे सांगत सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.

सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भरनागपुरात झालेल्या बैठकीला सरोज पांडे यांनी नागपूर, रामटेक व भंडारा या जागा मिळून करण्यात आलेल्या ‘क्लस्टर’चा आढावा घेतला. यावेळी या मतदारसंघांमधील खासदार, आमदार यांच्यासह भाजपाचे संघटनमंत्री विजय पुराणिक, विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, नागपूर शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, हेदेखील उपस्थित होते. तीनही लोकसभा क्षेत्रात ‘बूथ’पातळीच्या मजबुतीवर भर देण्याची सूचना सरोज पांडे यांच्याकडून देण्यात आली. सोबतच केंद्र व राज्य सरकारच्या योजना व कामे विविध माध्यमाने जास्तीत जास्त प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचविण्याचीदेखील सूचना करण्यात आली. ज्या पातळ््यांवर पक्ष मागे पडत आहे, त्याकडे विशेष लक्ष देण्यासदेखील त्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूक