शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

ढगांनी राेखला सूर्याचा ताप ! विदर्भातील तापमान घसरले

By निशांत वानखेडे | Updated: April 26, 2025 19:02 IST

Nagpur : उष्ण लाटांपासून दिलासा

निशांत वानखेडेनागपूर : मागील आठवडाभरापासून उष्ण लाटांच्या प्रखर उन्हापासून त्रस्त झालेल्या विदर्भातील नागरिकांना शनिवारी आकाशात दाटलेल्या ढगांनी माेठा दिलासा दिला. आकाश व्यापलेल्या ढगांनी सूर्यकिरणांची वाट राेखली  आणि नागपूरसह सर्व जिल्ह्यात तापमान घटले. उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला, पण वातावरणातील उष्ण वारे शरीराला झाेंबत राहिले.

मागील संपूर्ण आठवडा वैदर्भीयांसाठी तापदायक गेला. चंद्रपूर, ब्रम्हपुरी, अकाेला शहरांचा पारा ४५ पार जात जागतिक उष्ण शहरांच्या यादीत पाेहचला हाेता. नागपूरसह इतर शहरेही ४४ ते ४५ अंशाच्या दरम्यान पाेहचली हाेती. विदर्भात मुक्कामी असल्यासारखा सूर्याने उन्हाचा कहर केला. तापदायक वातावरणामुळे नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागले.

दरम्यान हवामान विभागाने २७ एप्रिलपासून पुन्हा अवकाळीची स्थिती निर्माण हाेईल, असा अंदाज वर्तविला  हाेता. या अंदाजाच्या एक दिवसाच्या अगाेदरच ढगाळ वातावरण तयार झाले. शनिवारी सकाळी उन्ह तापले हाेते, पण दुपार हाेईपर्यंत वातावरण बदलत गेले आणि आकाशात ढगांची गर्दी झाली. या ढगांनी सूर्यकिरणांची वाट राेखली. त्यामुळे तापमान खाली आले. नागपूरला १.४ अंशाची घट हाेत पारा ४२.६ अंशावर पाेहचला. भयंकर तापलेल्या चंद्रपूरच्या तापमानात ३.४ अंशाची घसरण हाेत पारा ४२ अंशावर आला. मात्र जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहराचा ताप शनिवारीही कायम हाेता. येथे ४४.२ अंश तापमान नाेंदविण्यात आले, जे विदर्भात सर्वाधिक राहिले.

इतर जिल्ह्यातही ढगाळ वातावरणामुळे पारा १ ते २ अंशाने खाली आला. अकाेला ४३.९, अमरावती ४२.८, भंडारा ४१, गाेंदिया ४०.९, वर्धा ४२.६, यवतमाळ ४२.४ आणि वाशिमला ४१.४ अंशाची नाेंद झाली आहे.

एप्रिलचा शेवट, मे ची सुरुवात ‘ताप’मुक्तदरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार एप्रिल महिन्यात सुरुवातीपासून आतापर्यंत उन्हाचा त्रास सहन करावा लागला असला तरी महिन्याचा शेवट मात्र तापमुक्त असणार आहे. पुढचे सर्व दिवस अवकाळीची स्थिती असून वीजांच्या कडकडाटासह ताशी ५० ते ६० किमीचे वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. मे महिन्याचे सुरुवातीचे दिवसही हीच स्थिती असेल. त्यानंतर मात्र पारा पुन्हा चढेल, असा अंदाज आहे.

टॅग्स :weatherहवामान अंदाजnagpurनागपूर