शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रस्त्यावर कपडे धुवून केली इस्त्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 10:00 IST

आंदोलनाचे केंद्रस्थळ झालेल्या संविधान चौकात सोमवारी अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले. येथे काही आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच कपडे धुतले व कपड्यांना इस्त्रीही केली.

ठळक मुद्देधोबी समाज संघटनासंविधान चौकात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंदोलनाचे केंद्रस्थळ झालेल्या संविधान चौकात सोमवारी अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले. येथे काही आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच कपडे धुतले व कपड्यांना इस्त्रीही केली. ये-जा करण्यासाठी आश्चर्यकारक वाटणारे हे आंदोलन महाराष्ट्र धोबी (परीट) समाज आरक्षण समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले. वर्षानुवर्षे पारंपरिक कपडे धुण्याचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या या समाजातर्फे न्याय हक्काच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.परीट समाजाच्या आरक्षणाबाबत डॉ. डी.एम. भांडे समितीचा अहवाल राज्याच्या शिफारशींसह केंद्र शासनाला पाठविण्याच्या मुख्य मागणीसाठी सोमवारी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. समन्वय समितीच्या सदस्या उज्ज्वला कामरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या स्थापनेच्या आधी परीट समाज अनुसूचित जाती (एससी)च्या वर्गवारीत समाविष्ट होता. मात्र राज्याच्या स्थापनेनंतर समाजाला एससीच्या वर्गवारीतून काढून ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे हा समाज सवलतीपासून वंचित राहिल्याने शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीपासूनही वंचित राहिलेला आहे. विशेष म्हणजे पारंपरिक व्यवसाय करणारा हा समाज देशभरात पसरला असून यातील १८ राज्यांमध्ये आजही एससीच्या वर्गवारीतच मोडला जातो. मग महाराष्ट्रातच हा अन्याय का, असा सवाल त्यांनी केला. ६१ वर्षे हक्कांसाठी आंदोलन केल्यानंतर राज्य शासनाने २००१ मध्ये डॉ. भांडे यांच्या अध्यक्षतेत ‘धोबी समाज पुनर्विलोकन समिती’ची स्थापना करण्यात आली. या समितीने धोबी समाज अस्पृश्यतेचा निकष पूर्ण करीत असून एससीमध्येच समाविष्ट करण्याचा अहवाल दिला होता. मात्र १६ वर्षे लोटूनही अहवाल लागू करण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आज राज्यभरात आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय संत गाडगेबाबा यांना भारतरत्न मिळावा, श्रीक्षेत्र ऋणमोचन येथे संत गाडगेबाबा यांचे स्मारक उभारण्यात यावे, गाडगेबाबा यांची जयंती स्वच्छता दिन म्हणून पाळण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनानंतर डी.डी. सोनटक्के, रामभाऊ डोंगरे, सुरेश भोस्कर, माणिकराव भोस्कर, अशोक क्षीरसागर, नंदा क्षीरसागर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले.

टॅग्स :agitationआंदोलन